एक्स्प्लोर

Bengaluru Engineering College Hidden Camera : इंजिनिअरिंग कॉलेजच्या लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा सापडला; बीटेकच्या विद्यार्थ्याला रेकॉर्डिंग करताना रंगेहाथ पकडले

Bengaluru Engineering College Hidden Camera : पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे. 21वर्षीय कुशल गौडा असे आरोपीचे नाव आहे. तो चिक्कागोल्लारहट्टी, मगडी रोड येथील रहिवासी आहे.

बंगळूर : कर्नाटकातील बेंगळुरू येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या महिला स्वच्छतागृहात (Bengaluru Engineering College Hidden Camera) छुपा कॅमेरा सापडला. बीटेकच्या एका विद्यार्थ्याला रेकॉर्डिंग करताना रंगेहात पकडण्यात आले आहे. तो फोन व्हेंटिलेटरमध्ये ठेवून शेजारील टॉयलेटमध्ये लपून रेकॉर्डिंग करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मुलीने फोन पाहिला. ती पटकन बाहेर आली आणि शेजारील शौचालयाला कुलूप लावले, ज्यामध्ये विद्यार्थिनी लपली होती. मुलीने आरडाओरड करून आणखी लोकांना बोलावले. यानंतर आरोपीला ओढत बाहेर काढून मुख्याध्यापकांच्या चेंबरमध्ये बंद करण्यात आले.

फोनमधून 15 मिनिटांचे रेकॉर्डिंगही सापडले

पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे.21वर्षीय कुशल गौडा असे आरोपीचे नाव आहे. तो चिक्कागोल्लारहट्टी, मगडी रोड येथील रहिवासी असून संगणक विज्ञान 7व्या सेमिस्टरचा विद्यार्थी आहे. त्याच्या फोनमधून 15 मिनिटांचे रेकॉर्डिंगही सापडले. पोलीस म्हणाले की, कॉलेज व्यवस्थापनही जबाबदार असून सीसीटीव्ही काम करत नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅमेरा पाहून मुलीने सकाळी 10.45 वाजता अलार्म वाजवला होता. म्हणजेच सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आरोपींनी मोबाईल फोन रेकॉर्डिंगवर ठेवला होता. कॉलेज व्यवस्थापनालाही दोषी धरलं पाहिजे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. महिला स्वच्छतागृहाजवळ बसवलेले सीसीटीव्ही काम करत नाहीत. याशिवाय स्वच्छतागृहाजवळ एकही महिला परिचर तैनात नव्हती.

स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा सापडण्याची दीड महिन्यात दुसरी घटना

पोलिसांनी सांगितले की, आरोपी विद्यार्थ्याविरुद्ध कलम 77, 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही त्याने असे केले आहे का, याचा शोध घेण्यासाठी त्याच्या फोनचा डेटा तपासला जात आहे. बंगळुरूमधील सार्वजनिक स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा सापडण्याची दीड महिन्यात (Bengaluru Engineering College Hidden Camera) ही दुसरी घटना आहे. याआधी 10 ऑगस्ट रोजी एका प्रसिद्ध कॉफी शॉपच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा सापडला होता. बीईएल रोडवरील थर्ड वेव्ह कॉफी आउटलेटमध्ये ही घटना घडली होती. कॉफी शॉपच्या वॉशरूममधील टॉयलेट शीटसमोरील डस्टबिनमध्ये कॅमेरा लपवला होता. दोन तास रेकॉर्डिंग चालू होते. एका महिलेने कॅमेरा पाहिला. फोन फ्लाइट मोडवर होता, जेणेकरून कॉल किंवा मेसेज आल्यावर कोणत्याही प्रकारचा आवाज येणार नाही. या प्रकरणी कॅफेच्या एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satypal Malik Meet Uddhav Thackeray : सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा
Satypal Malik Meet Uddhav Thackeray : सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा
एकच वादा अजित  दादा! धाराशिवच्या दाजींना दिलेला शब्द अजित पवार पूर्ण करणार?
एकच वादा अजित दादा! धाराशिवच्या दाजींना दिलेला शब्द अजित पवार पूर्ण करणार?
Pune News: जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोघांना विजेचा शॉक; एकाचा मृत्यू, एक जखमी
जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोघांना विजेचा शॉक; एकाचा मृत्यू, एक जखमी
PM Modi US Visit : ट्रम्प की कमला? भारतासाठी कोण योग्य? मोदींकडून अमेरिकन संसदेत कमलांचे कौतुक, ट्रम्प यांना चांगले मित्र म्हटले होते; आता कोणासोबत?
ट्रम्प की कमला? भारतासाठी कोण योग्य? मोदींकडून अमेरिकन संसदेत कमलांचे कौतुक, ट्रम्प यांना चांगले मित्र म्हटले होते; आता कोणासोबत?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maratha Protester Meeting Varhsa : शिष्टमंडळासोबत शंभूराजे देसाई, मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा वर बैठकSatypal Malik Meet Uddhav Thackeray : सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चाLaxman Hake On Manoj jarange : जरांगे छत्रपतींच्या वारसावर खालच्या भाषेत टीका करतातManoj Jarange Patil Jalna PC : सुरुवात तुम्ही केली, शेवट मराठे करणार, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satypal Malik Meet Uddhav Thackeray : सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा
Satypal Malik Meet Uddhav Thackeray : सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा
एकच वादा अजित  दादा! धाराशिवच्या दाजींना दिलेला शब्द अजित पवार पूर्ण करणार?
एकच वादा अजित दादा! धाराशिवच्या दाजींना दिलेला शब्द अजित पवार पूर्ण करणार?
Pune News: जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोघांना विजेचा शॉक; एकाचा मृत्यू, एक जखमी
जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोघांना विजेचा शॉक; एकाचा मृत्यू, एक जखमी
PM Modi US Visit : ट्रम्प की कमला? भारतासाठी कोण योग्य? मोदींकडून अमेरिकन संसदेत कमलांचे कौतुक, ट्रम्प यांना चांगले मित्र म्हटले होते; आता कोणासोबत?
ट्रम्प की कमला? भारतासाठी कोण योग्य? मोदींकडून अमेरिकन संसदेत कमलांचे कौतुक, ट्रम्प यांना चांगले मित्र म्हटले होते; आता कोणासोबत?
Lakshman Hake: छत्रपतींच्या वारसांना जरांगे खासगीत खालच्या भाषेत बोलतात, लक्ष्मण हाकेंचा दावा, म्हणाले...
छत्रपतींच्या वारसांना जरांगे खासगीत खालच्या भाषेत बोलतात, लक्ष्मण हाकेंचा दावा, म्हणाले...
Army officer Odisha police station : मेजरची होणारी पत्नी छेडछाडीची तक्रार द्यायला गेली, पोलिस स्टेशनमध्ये ब्रा, पॅन्ट खेचून स्तनांवर लाथांनी मारहाण; छेड काढणाऱ्या आरोपींना फक्त चार तासात जामीन
मेजरची होणारी पत्नी छेडछाडीची तक्रार द्यायला गेली, पोलिस स्टेशनमध्ये ब्रा, पॅन्ट खेचून स्तनांवर लाथांनी मारहाण; छेड काढणाऱ्या आरोपींना फक्त चार तासात जामीन
फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळ केलं, आता अन्याय सहन करणार नाही, जशास तसे उत्तर देणार, जरांगे पाटलांचा इशारा
फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळ केलं, आता अन्याय सहन करणार नाही, जशास तसे उत्तर देणार, जरांगे पाटलांचा इशारा
Redmi स्मार्टफोन मिळणार सर्वात स्वस्तात, फेस्टीव सिझन सेलमध्ये Xiaomi च्या या मोबाईलवर बंपर ऑफर, किती रुपयाला मिळणार?
Redmi स्मार्टफोन मिळणार सर्वात स्वस्तात, फेस्टीव सिझन सेलमध्ये Xiaomi च्या या मोबाईलवर बंपर ऑफर, किती रुपयाला मिळणार?
Embed widget