एक्स्प्लोर
मिस व्हीलचेअर वर्ल्ड स्पर्धेसाठी भारताची डॉ. राजलक्ष्मी सज्ज
2007 मध्ये बीडीएसची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्समध्ये प्रेझेंटेशनसाठी राजलक्ष्मी चेन्नईला जात होती. त्यावेळी रस्त्यात तिला भीषण अपघात झाला.
बंगळुरु : मिस व्हीलचेअर वर्ल्ड स्पर्धा यावर्षी पोलंडमध्ये पार पडणार असून भारतातर्फे डॉक्टर राजलक्ष्मी सज्ज झाली आहे. डेन्टिस्ट असलेल्या 31 वर्षीय राजलक्ष्मीने 2014 मध्ये मिस व्हीलचेअर इंडिया हा किताब पटकावला होता.
2007 मध्ये बीडीएसची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्समध्ये प्रेझेंटेशनसाठी राजलक्ष्मी चेन्नईला जात होती. त्यावेळी रस्त्यात तिला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिला स्पायनल इंज्युरी झाली होती आणि तिच्या पायाला अर्धांगवायू झाला.
नियतीपुढे हात टेकण्याऐवजी राजलक्ष्मीने मानसशास्त्र आणि फॅशन या विषयातील आपली आवड वाढवली. मिस व्हीलचेअर इंडिया स्पर्धेविषयी माहिती मिळाल्यानंतर तिने त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मिस व्हीलचेअरचा मुकूट पटकावणं तिच्यासाठी स्वप्नवत होतं. आता जागतिक पातळीवर देशाचं नेतृत्व करण्याची संधी तिला मिळाली आहे.
राजलक्ष्मीने काही शाळांमध्ये मोफत डेन्टल चेक अप कॅम्प आयोजित केले होते. व्हीलचेअर ट्रेनिंगसाठीही ती मदत करते. फॅशन इंडस्ट्रीसोबतच ती व्हीलचेअर बास्केटबॉल आणि व्हीलचेअर डान्समध्येही सहभागी झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
कोल्हापूर
सोलापूर
Advertisement