एक्स्प्लोर
बिअर पॅरासिटामॉलपेक्षा प्रभावी पेनकिलर ठरण्याची शक्यता
मुंबई : उन्हाळ्यात थंडाव्यासाठी बिअर रिचवणाऱ्या मद्यप्रेमींना आता आपली बाजू भक्कम करण्याचं आणखी एक कारण मिळालं आहे. पॅरासिटामॉलपेक्षाही बिअर ही प्रभावी वेदनाशामक असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे.
यूकेमधील ग्रीनविच युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी सुमारे 400 जणांवर केलेल्या 18 सर्वेक्षणांमध्ये ही लक्षवेधी बाब समोर आली आहे.
बिअर प्यायल्यामुळे मेंदूतील चेतातंतूंवर परीणाम होऊन वेदना शमवता येतात का, याचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी बिअरचं प्रमाण जितकं जास्त, तितक्या सहभागींना वेदना कमी जाणवल्याचं संशोधकांच्या समोर आलं
'अल्कोहोल ही अत्यंत प्रभावी वेदनाशामक असल्याचे सबळ पुरावे मिळाले आहेत.' असं ग्रिनविच युनिव्हर्सिटीच्या ट्रेवॉर थॉमसन यांनी म्हटल्याचं 'द सन' या ब्रिटीश वृत्तापत्राने छापलं आहे. विशेष म्हणजे पॅरासिटामॉलशी तुलना करता बिअर अधिक प्रभावी असल्याचं समोर आलं आहे.
वैद्यकीयदृष्ट्या वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी बिअर ही परिणामकारक असल्याचं संशोधनात समोर आलं आहे. मात्र दीर्घकालीन वेदना शमवण्यासाठी बिअर हा उपाय नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे साईड इफेक्ट टाळून अशा पद्धतीने एखादा ड्रग तयार करता आला, तर सध्याच्या घडीला उपलब्ध असलेल्या वेदनाशामकांपेक्षा (पॅरासिटामॉल) तो प्रभावी ठरेल, असा विश्वास थॉमसन यांना वाटतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement