एक्स्प्लोर
VIDEO : लग्नाच्या वरातीत नाचताना भोवळ, नवरदेवाचा मृत्यू

बडोदा : स्वतःच्या लग्नाच्या वरातीत नाचताना नवरदेवाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमधल्या बडोद्यातील रनोली गावात ऐन वरातीतच 25 वर्षीय नवरदेवाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये नवरदेव सागर सोलंकी लग्नाच्या वरातीत नाचताना दिसत आहे. त्याचा सर्व मित्रपरिवार सागरच्या लग्नाचा जल्लोष साजरा करत आहेत. सागरच्या मित्रानं त्याला खांद्यावर घेतलं आहे आणि मित्रांसोबत सागरही नाचत आहे.
नाचता-नाचता सागरला अचानक चक्कर आली आणि त्यानं मान खाली टाकली. क्षणभर कोणालाही याचं गांभीर्य लक्षात आलं नाही. मित्राने त्याला खांद्यावरुन खाली उतरवलं. वरातीत नाचणारे इतरही जण त्याच्याकडे धावले, मात्र तो शुद्धीवर नव्हताच.
त्यानंतर मित्रांनी सागरला रुग्णालयात दाखल केलं. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. सागरला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याची माहिती आहे. आयुष्याचा एक नवा टप्पा सुरु होण्याआधीच सागरचं आयुष्य संपल्यानं सोलंकी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पाहा व्हिडिओ :
नाचता-नाचता सागरला अचानक चक्कर आली आणि त्यानं मान खाली टाकली. क्षणभर कोणालाही याचं गांभीर्य लक्षात आलं नाही. मित्राने त्याला खांद्यावरुन खाली उतरवलं. वरातीत नाचणारे इतरही जण त्याच्याकडे धावले, मात्र तो शुद्धीवर नव्हताच.
त्यानंतर मित्रांनी सागरला रुग्णालयात दाखल केलं. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. सागरला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्याची माहिती आहे. आयुष्याचा एक नवा टप्पा सुरु होण्याआधीच सागरचं आयुष्य संपल्यानं सोलंकी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पाहा व्हिडिओ : आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रीडा
मुंबई























