एक्स्प्लोर

म्हणून 200, 2000 रुपयांच्या खराब नोटा बँकेत बदलता येणार नाहीत!

नव्या मालिकेत फाटलेल्या किंवा खराब नोटांची फारच कमी प्रकरणं समोर आली आहेत. पण कायद्यात लवकरात सुधारणा केल्या नाहीत तर अडचणी येऊ शकतात, असं जाणकारांचं मत आहे.

नवी दिल्ली : 200 आणि 2000 रुपयांच्या नोटा जारी करुन आता सुमारे दीड वर्ष झालं आहे. पण या नोटा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे खराब झाल्या तर त्या बँकेत जमा करता येणार नाहीत किंवा त्या बदलताही येणार नाहीत. कारण करन्सी एक्स्चेंज नियमांच्या कक्षेत नव्या नोटा ठेवलेल्याच नाहीत. फाटलेल्या किंवा खराब नोटा बदलण्याचं प्रकरण आरबीआयच्या (नोट रिफण्ड) नियामाच्या अंतर्गत येतं. आरबीआय कायद्याच्या कलम 28 चा तो भाग आहे. या कलमात 5, 10, 50, 100, 500, 1,000, 5,000 आणि 10,000 रुपयांच्या नोटांचा उल्लेख आहे. पण 200 आणि 2,000 रुपयांच्या नोटांचा यात समावेश नाही. याचं कारण म्हणजे सरकार आणि आरबीआयने या नोटांच्या एक्स्चेंजवर लागू होणाऱ्या तरतुदींमध्ये बदल केलेला नाही. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीच्या घोषणेनंतर 2000 रुपयांची नोट जारी केली होती. तर 200 रुपयांची नोट ऑगस्ट 2017 मध्ये चलनात आली. सध्या 2000 च्या सुमारे 6.70 लाख कोटी रुपये किंमतीच्या नोटा चलनात आहेत. शिवाय आरबीआयने आता 2000 रुपयांच्या नोटांची छपाईही बंद केली आहे. नव्या मालिकेत फाटलेल्या किंवा खराब नोटांची फारच कमी प्रकरणं समोर आली आहेत. पण कायद्यात लवकरात सुधारणा केल्या नाहीत तर अडचणी येऊ शकतात, असं जाणकारांचं मत आहे. आरबीआयचा दावा 2017 मध्येच या सुधारणांच्या आवश्यकतेबाबत अर्थ मंत्रालयाला पत्र पाठवलं होतं, असा दावा आरबीआयने केला आहे. पण आरबीआयला सरकारकडून अद्याप कोणतंही उत्तर मिळालेलं नाही. कायद्याच्या कलम 28 मध्ये सुधारणा कराव्या लागतील, ज्याचा संबंध हरवलेल्या, चोरी झालेल्या, फाटलेल्या किंवा खराब नोटांच्या रिकव्हरीबाबत आहे. ...तरच नोटा बदलता येतील नव्या मालिकेतील नोटा सध्या बँकेत बदलता येऊ शकत नाही. महात्मा गांधी (नव्या) मालिकेतील नोटांच्या आकारातील बदलामुळे फाटलेल्या किंवा खराब नोटांची अदलाबदली सध्याच्या नियमांच्या अंतर्गत येऊ शकत नाही. परिणामी आरबीआय (नोट रिफण्ड) नियम 2009 मध्ये सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे. अधिकृत गॅझेटमध्ये बदलाचा अधिसूचना जारी झाल्यानंतर महात्मा गांधी (नव्या) मालिकेतील फाटलेल्या किंवा खराब नोटा बदलता येऊ शकतात, असं आरबीआयचं म्हणणं आहे. पण सरकार हे आवश्यक बदल करण्यास एवढा वेळखाऊपण का करत आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. "मात्र सरकार गरजेच्या बदलांवर विचार करेल," असं अर्थमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. "जे आवश्यक असेल तर करणार," असंही ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Anand Ashram Video : 19 वर्षांनी आनंदाश्रमात पहिलं पाऊल, राज ठाकरेंचा संपूर्ण व्हिडीओRaj Thackeray Thane : शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदा दिघेंच्या आनंद आश्रमातRaj Thackeray Thane : राज ठाकरे आनंद आश्रमात, Anand Dighe यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तकTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 07 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
Embed widget