Bank Holidays 2021 | तब्बल 40 दिवस बँका बंद; पाहा बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी
नव्या वर्षाच्याच सुरुवातीला एकदा बँक हॉलिडेंच्या अर्थांत बँकांच्या सुट्ट्यांवर नक्की नजर टाका. कारण, निश्चित सुट्ट्यांसोबतच यंदाच्या वर्षी राज्या- राज्यांच्या दृष्टीनंही या यादीत काही सुट्ट्या जोडल्या गेल्या आहेत.
मुंबई : रिजर्व्ह बँक ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार 2021 या वर्षात बँका तब्बल 40 दिवस बंद असणार आहेत. दरवर्षीप्रमाणं यंदाही देशातील बँकांवर अंकुश असणाऱ्या रिजर्व्ह बँकेनं बँकेला देण्यात येणाऱ्या सुट्ट्या जाहीर केल्या. या यादीत नमुद केलेल्या सुट्ट्या वगळता बहुतांश बँका दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी काम करत नाहीत तसंच सर्वच बँका रविवारी बंदच असतात.
रिजर्व्ह बँकेनं दिलेल्या सुट्ट्या वगळता काही बँकांना स्थामिक सणांच्याही सुट्ट्या असतात. त्यामुळं चला तर मग बँकांना यंदाच्या वर्षी नेमकी कधी सुट्टी आहे ते पाहूयात. म्हणजे बँकेत जाण्यापूर्वी आपल्याला या सर्व गोष्टींची कल्पना असेल.
जानेवारी 26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन
फेब्रुवारी आरबीआयच्या वेळापत्रकानुसार या महिन्यात एकही वाढीव सुट्टी नाही
मार्च 11 मार्च - महाशिवरात्र 29 मार्च - होळी
एप्रिल 1 एप्रिल- क्लोझिंग अकाऊंट्स 2 एप्रिल - गुड फ्रायडे 14 एप्रिल - आंबेडकर जयंती 25 एप्रिल - महावीर जयंती
मे 13 मे - रमजान ईद
जून या महिन्यातही कोणतीही सुट्टी नाही
जुलै 20 जुलै- बकरी ईद
ऑगस्ट 15 ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन 19 ऑगस्ट - मोहरम
सप्टेंबर 10 सप्टेंबर - गणेश चतुर्थी
ऑक्टोबर 2 ऑक्टोबर - महात्मा गांधी जयंती 15 ऑक्टोबर - दसरा
नोव्हेंबर - 4 नोव्हेंबर - दिवाळी 19 नोव्हेंबर - गुरुनानक जयंती
डिसेंबर 25 डिसेंबर - ख्रिसमस
(प्रत्येक राज्यांंध्ये देण्यात येणाऱ्या वाढीव सुट्ट्या या यादीत समाविष्ट नाहीत.)