एक्स्प्लोर
Advertisement
प्राथमिक स्तरावरील मदरशे बंद करा, वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांची मागणी
दहशतवादी संघटना 'इस्लामिक स्टेट'चा (आयएस) मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुस्लिम मुलांवरील प्रभाव रोखण्यासाठी देशभरातील प्राथमिक स्तरावरील मदरशे बंद करावेत,' अशी मागणी वसीम रिझवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्र लिहून केली आहे.
लखनौ : इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा मुस्लिम मुलांवरील प्रभाव रोखण्यासाठी प्राथमिक स्तरावरील मदरशे बंद करावेत अशी मागणी उत्तर प्रदेशच्या शिया केंद्रीय वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केली आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींना देखील पत्र लिहिलं आहे. लहान मुलांवर कोणत्याही विचारांचा लगेच परिणाम होतो. ती रोखण्यासाठी बंदीची मागणी केली असल्याची प्रतिक्रिया रिझवी यांनी दिली आहे.
दहशतवादी संघटना 'इस्लामिक स्टेट'चा (आयएस) मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुस्लिम मुलांवरील प्रभाव रोखण्यासाठी देशभरातील प्राथमिक स्तरावरील मदरशे बंद करावेत,' अशी मागणी वसीम रिझवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्र लिहून केली आहे.
रिझवींनी पत्रात म्हटले आहे की, मुस्लिम मुलांना मदरशांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर घ्यावा. लहान मुलांवर कोणत्याही विचारांचा लगेच प्रभाव निर्माण होतो. 'आयएस' या दहशतवादी संघटनेचा जगभरातील मुस्लिम मुलांवर वेगाने प्रभाव निर्माण होत आहे. देशातील मदरशे तत्काळ बंद न केल्यास जवळपास निम्मी लोकसंख्या पुढील पंधरा वर्षांत आयएसची समर्थक बनेल, असे त्यांनी म्हटले आहे.
आयएसचा प्रभाव वाढल्यानंतर काय होते, हे आता काश्मीरमध्ये दिसत आहे. जी मुले मदरशांमध्ये शिकतात ती इतर धर्माचा तिरस्कार करतात, त्यांच्यापासून वेगळी राहताना दिसतात. देशाच्या ग्रामीण भागातील मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांमध्ये मूलतत्त्ववाद वाढत आहे. त्यामुळे देशाचे आणि मुस्लिम मुलांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे मुलांना मदरशांमध्ये पाठवायचे असल्यास माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर पाठवावे. तसे केल्यास देशात वाढणारा मुलतत्ववाद रोखता येईल, असे रिझवींनी म्हटले आहे. दरम्यान, रिझवी यांनी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती आणि समान नागरी कायद्याला आमचा पाठिंबा आहे, असेही म्हटले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement