Assembly Election Result 2017 : पाच राज्यांचे अंतिम निकाल
सर्व पाच राज्यांचा अंतिम निकाल
उत्तर प्रदेश
देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 403 जागांच्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाने एकहाती विजय मिळवत तब्बल 325 जागा जिंकल्या. उत्तर प्रदेशात सत्ता स्थापनेसाठी 202 जागांची गरज आहे. मात्र भाजपने त्यापुढे मजल मारुन तब्बल 305 जागी विजय मिळवला. यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये 1991 मध्ये राम मंदिराच्या आंदोलन काळात झालेल्या निवडणुकीत भाजपला 221 जागा मिळाल्या होत्या. यंदा भाजपने त्यापुढे मोठी झेप घेत तब्बल 300 चा आकडा ओलांडला आहे. उत्तर प्रदेशात कोणत्या पक्षाला किती जागा? भाजप – 312 +( अपना दल 9, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 4) = 325 समाजवादी पक्ष – 47 काँग्रेस – 7 बसपा – 19 राष्ट्रीय लोक दल – 1 इतर -04उत्तराखंड
पंजाब
पंजाब विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाला मोठा धक्का बसला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसने बहुमताचा 59 हा आकडा सहजरित्या पार केला आहे.
काँग्रेसने 70 जागा जिंकल्या असून 7 जागांवर उमेदवार आघाडीवर आहे. तर आम आदमी पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर शिरोमणी अकाली दल आणि भाजप युतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत.
काँग्रेस : 77
आम आदमी पक्ष : 20
अकाली दल 15 + भाजप 3 : 15
लोक इन्साफ पार्टी : 02
गोवा
उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भाजपला गोव्यात काँग्रेसनं काँटे की टक्कर दिली. गोव्याच्या 40 जागांच्या विधानसभेत काँग्रेस नंबर एकचा पक्ष ठरला आहे. काँग्रेसने 17 जागांवर विजय मिळवला. मात्र 13 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला सत्ताधारी भाजप सत्तेसाठी छोट्या पक्षांशी युती करण्याची शक्यता आहे.
गोव्यात कुणाला किती जागा?
भाजप – 13
काँग्रेस – 17
राष्ट्रवादी काँग्रेस -1
महाराष्ट्रवादी गोमंतक – 3
गोवा फॉरवर्ड पार्टी – 3
अपक्ष/इतर – 3
मणिपूर
मणिपूरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला भाजपने कडवी झुंज दिली. 60 जागांच्या मणिपूर विधानसभेत काँग्रेसने 26 जागांवर विजय मिळवला, तर भाजपला 21 जागा जिंकता आल्या.
मणिपूरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 31 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे स्थानिक पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत आहेत.
मणिपूरमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप – 21
काँग्रेस – 28
नागा पीपल्स फ्रंट – 4
नॅशनल पीपल्स पार्टी – 4
तृणमूल काँग्रेस -1
अपक्ष – 1
लोकजनशक्ती पार्टी – 1
- आमची 'सायकल' ट्युबलेस आहे, कधीच पंक्चर होत नाही - अखिलेश यादव
- नवं सरकार 'समाजवादी'पेक्षा चांगलं काम कसं करतं, हे पाहण्यासाठी उत्सुक आहे - अखिलेश यादव
- मायावतींनी जर EVM वर प्रश्न उपस्थित केले असतील, तर सरकारने चौकशी केली पाहिजे - अखिलेश यादव
- दोन युवा नेते सोबत आले, यापुढेही आघाडी कायम राहील - अखिलेश यादव
- उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांसह देशातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल अशी अपेक्षा करतो : अखिलेश यादव
- आमच्यापेक्षा अधिक चांगलं काम आगामी सरकारने करावं - अखिलेश यादव
- जनतेचा कौल मान्य, कार्यकर्त्यांचे आभार- अखिलेश यादव
- उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील विजयाबद्दल पंतप्रधान मोदी आणि भाजपचं अभिनंदन : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी
- काँग्रेसचा पराभव मी स्वीकार करतो, माझ्या नेतृत्त्वात काही कमतरता राहिली, त्यामुळे उत्तराखंडमध्ये आमचा पराभवा झाला - हरिश रावत
- उत्तर प्रदेशच्या जनतेचे धन्यवाद, भाजपचा हा ऐतिहासिक विजय म्हणजे विकास आणि सुशासनाचा विजय - नरेंद्र मोदी
- मणिपूर - भाजप 23, काँग्रेस 22, इतरांना 11 जागांवर आघाडी
- उत्तराखंड - भाजप 57, काँग्रेस 11, इतर 2 जागा
- भारतीय जनता पार्टी 'राष्ट्रवादी' पार्टी आहे, देशहिताला प्राधान्य - अमित शाह
- आमच्या घोषणापत्रात राम मंदिराचा उल्लेख आहेच, सरकार आलंय तर आता मंदिर उभारणीचं स्वप्न पूर्ण होणार का या प्रश्नावर शाहांचं उत्तर
- हिंदू-मुस्लिम यातून बाहेर या, मतदार हा मतदारच असतो - अमित शाह
- जातीवाद, घराणेशाही, भ्रष्टाचार या सगळ्याला मतदारांंनीच चोख प्रत्युत्तर दिल्याचं निकालातून दिसतंय - अमित शहा
- सर्वांनी हे आता मान्य करायला पाहिजे की नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतरचे देशातले सर्वात लोकप्रिय नेते बनलेले आहेत- भाजपाध्यक्ष अमित शहा
- हा विजय राजकारण बदलेल - अमित शाह
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा हा विजय: अमित शाह
- यूपी, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या चारही राज्यांत भाजप सरकार स्थापन करणार - अमित शाह
- यूपीमध्ये आम्हाला मिळालेला विजय स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा विजय- अमित शहा
- गोवा - भाजप आणि काँग्रेसमध्ये नेक टू नेक फाईट, भाजप 14, काँग्रेस 14, आप 0, गोसुमं+3, इतरांना 7 जागांवर आघाडी
- उत्तर प्रदेश - भाजप 318, सपा+काँग्रेस 59, बसपा 20, इतर 6 जागांवर आघाडीवर
- पंजाबमधील मोठ्या विजयानंतर काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंह यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिनंदन
- तुमच्यात थोडासा तरी प्रामाणिकपणा असेल तर पुन्हा निवडणुका घ्या, मायावतींचं अमित शाह यांना आव्हान
- EVM मध्ये छेडछाड करुन भाजपने लोकशाहीची हत्या केली - मायावतींचा आरोप
- महाराष्ट्रातील मनपा, झेडपी निवडणुकीतही EVM वर आक्षेप नोंदवण्यात आला - मायावतींचा आरोप
- कोणतंही बटण दाबलं तरी भाजपला मत, EVM मध्ये छेडछाड करुन भाजपने विजय विजय मिळवला- मायावतींचा आरोप
- मुस्लिम बहुल भागातही भाजपला मतं मिळाली, मतदान यंत्रं मॅनेज केली, बसपा नेत्या मायावतींचा आरोप
- यूपीच्या जनतेने विकासाला बहुमत दिलं - मुख्यमंत्री
- हा विजय गरिबांचा, हा विजय मोदींच्या नेतृत्त्वावरील विश्वासाचा - मुख्यमंत्री
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारदर्शी कारभाराला देशाची पसंती - मुख्यमंत्री
- नोटाबंदीला विरोध करणाऱ्यांना जनतेने निकालातून जागा दाखवली- मुख्यमंत्री
- चलनबंदी देशातील लोकांनी स्वीकारल्याचं हा निकाल सांगतो - मुख्यमंत्री
- आजच्या नवयुगावर देशाचा विश्वास, हे युग देशाला विकासाकडे घेऊन जाणार- मुख्यमंत्री
- निवडणूक निकालाने देशाचा मूड काय आहे हे दिसतं, मोदींच्या नेतृत्तावचा विजय - मुख्यमंत्री
- उत्तर प्रदेश - भाजप 309, सपा+काँग्रेस 68, बसपा 18, इतरांना 08 जागांवर आघाडी
- गोवा - भाजप 9, काँग्रेस 12, आप 0, गोसुमं+ 2, इतरांना 4 जागांवर आघाडी
- गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसुजा म्हापसा मतदारसंघातून विजयी
- उत्तर प्रदेश - भाजप 302, सपा+काँग्रेस 71, बसपा 20, इतरांना 10 जागांवर आघाडी
- उत्तर प्रदेश - भाजप 297, सपा+काँग्रेस 74, बसपा 23, इतरांना 9 जागांवर आघाडी
- गोवा - भाजप 7, काँग्रेस 11, आप 0, गोसुमं+ 2, इतरांना 5 जागांवर आघाडी
- उत्तर प्रदेश - सर्व 403 जागांचे कल हाती, भाजप 295 जागांवर आघाडी, सपा+काँग्रेस 74, बसपा 25, इतरांना 9 जागांवर आघाडी
- पंजाब- अकाली+भाजप 27, काँग्रेस 63, आप 26, इतर 2
- गोवा - भाजप 04, काँग्रेस 06, आप 00, गोसुमं आघाडी 02, इतर 03
- उत्तर प्रदेश - (403/403) - भाजप 295, सपा+काँग्रेस 74, बसपा 25, इतर 9
- वाराणसीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
- पंजाब- अकाली+भाजप 27, काँग्रेस 63, आप 26, इतर 2
- मणिपूरमध्ये मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला पिछाडीवर, मुख्यमंत्री ओकराम इबोबीसिंग आघाडीवर
- उत्तर प्रदेशात दलित किंवा ओबीसी मुख्यमंत्री व्हावा, भाजप खासदार साक्षी महाराज यांची इच्छा
- उत्तर प्रदेश - भाजप 279, सपा+काँग्रेस 74, बसपा 25, इतर 12
- पंजाब- अकाली+भाजप 26, काँग्रेस 59, आप 24, इतर 2
- उत्तरप्रदेश-मोदींच्या वाराणसीतील दक्षिण वाराणसी मतदारसंघात काँग्रेसचे राजेश मिश्रा 5796 मतांनी आघाडीवर
- उत्तर प्रदेश - काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रायबरेली आणि अमेठीमध्ये 10 पैकी 6 जागांवर भाजपला आघाडी
- पंजाब - कलांमध्ये काँग्रेसला 59 जागांच्या आघाडीसह बहुमत, अकाली+भाजप 23, आप 21, इतर
- उत्तर प्रदेश - दलितबहुल भागात 100 पैकी 64 जागांवर, यादवबहुल भागात 60 पैकी 33 जागी भाजप आघाडीवर
- पंजाब- अमृतसरमधून काँग्रेसचे नवज्योतसिंह सिद्धू 6 हजार 135 मतांनी आघाडीवर
- उत्तर प्रदेश - मुस्लीमबहुल मतदारसंघातील जागांवर भाजप आघाडीवर
- गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव, मांद्रे मतदारसंघातून साडेतीन हजार मतांनी पराभूत
- पंजाबमध्ये काँग्रेस बहुमताजवळ, अकाली+ 24 जागांसह दुसऱ्या स्थानावर आणि आप 21 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर
- उत्तराखंड - देहरादूनच्या भाजपा कार्यालयात जल्लोष, भाजप 70 पैकी 49 जागांवर आघाडीवर
- पंजाब - काँग्रेस 55, अकाली+भाजप 24, आप 21, इतर 3
- उत्तराखंड - भाजप 49, काँग्रेस 17, यूकेडी 0, इतरांना 4 जागांवर आघाडी
- उत्तर प्रदेश - भाजप 252, सपा+काँग्रेस 70, बसपा 29, इतरांना 10 जागांवर आघाडी
- पंजाब - काँग्रेस बहुमताजवळ, काँग्रेसला 55 जागांवर आघाडी, अकाली+भाजप 14, आप 23, आप 23, इतर 2
- भाजपला 1991 नंतर पहिल्यांदाच यूपी निवडणुकीत इतकी मोठी आघाडी, भाजप 240 जागांवर आघाडीवर
- उत्तर प्रदेश - भाजप 238, सपा+काँग्रेस 68, बसपा 31, इतरांना 10 जागांवर आघाडी
- उत्तराखंड - भाजप 45, काँग्रेस 20, यूकेडी 0, इतरांना 4 जागांवर आघाडी
- पंजाब - सध्याच्या कलानुसार, काँग्रेस 33, अकाली+भाजप 14, आप 16 जागांवर आघाडी
- गोवा - भाजप 2, काँग्रेस 6, आप 0, गोसुमं+ 0, इतरांना 1 जागेवर आघाडी
- मणिपूर - भाजप 3, काँग्रेस 7, तृणमूल 0, इतरांना 3 जागांवर आघाडी
- पंजाब - सध्याच्या कलानुसार, काँग्रेस 33, अकाली+भाजप 14, आप 16 जागांवर आघाडी
- उत्तर प्रदेश - भाजप 209, सपा+काँग्रेस 60, बसपा 35, इतर 12
- उत्तर प्रदेशात भाजपची घोडदौड, आतापर्यंतच्या कलात भाजपला बहुमत, 205 जागांवर आघाडी
- गोवा - भाजप 2, काँग्रेस 6, आप 0, गोसुमं 0, इतर 0, मांद्रे मतदारसंघ मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर पिछाडीवर
- उत्तर प्रदेश- भाजप 187, सपा+काँग्रेस 40, बसपा 26, इतर 11
- उत्तर प्रदेश- भाजप 160, सपा+काँग्रेस 47, बसपा 30, इतर 8
- सध्याच्या कलानुसार उत्तराखंडमध्ये भाजपला बहुमत, 70 पैकी 36 जागांवर आघाडी
- उत्तर प्रदेश - भाजप 140, सपा+काँग्रेस 44, बसपा 28, इतर 7
- उत्तर प्रदेश - भाजप 125, सपा+काँग्रेस 37, बसपा 25, इतर 7
- पंजाब- अकाली+भाजप 6, काँग्रेस 23, आप 14, इतर 0
- उत्तर प्रदेशात भाजपची घोडदौड, भाजपची आघाडी 100 वर
- उत्तराखंड: भाजप 22, काँग्रेस 10, युकेडी 0, इतर 1
- पंजाब : प्रकाश सिंह बादल आघाडीवर, कॅप्टन अमरिंदर सिंह पिछाडीवर
- उत्तर प्रदेश : सपा नेते आझम खान रामपूरमधून आघाडीवर
- उत्तर प्रदेश : भाजपच्या रिता बहुगुणा आघाडीवर, अपर्णा यादव मागे
- उत्तर प्रदेश : सुरुवातीच्या कलांनुसार शहरी भागात भाजप आघाडीवर
- गोवा : गरज भासल्यास भाजपला साथ देण्याची महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची तयारी, सूत्रांची माहिती
- गोवा : देवाचं दर्शन घेतलं, मतमोजणी थोड्याच वेळात सुरु होईल, देवाची इच्छा असेल तर पुन्हा मुख्यमंत्री होईल : लक्ष्मीकांत पार्सेकर
- उत्तर प्रदेशात सर्वच पक्षांनी खाते उघडले
- उत्तर प्रदेशात पोस्टल मतमोजणीत पहिला कल मायावतींना, मऊमधून 'बाहुबली' मुख्तार अन्सारी आघाडीवर
- -----