आशुतोष यांच्या राजीनाम्यावर केजरीवाल म्हणतात...
आम आदमी पार्टीचे नेते आशुतोष यांचा राजीनामा स्वीकारण्यास अरविंद केंजरीवाल यांनी नकार दिला आहे.
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे नेते आशुतोष यांनी ट्विटरवरुल आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. मात्र अरविंद केंजरीवाल यांनी मात्र आशुतोष यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला आहे.
केजरीवाल यांनी आशुतोष यांचं ट्वीट रिट्वीट केलं आणि म्हटलं की, "आम्ही तुमचा राजीनामा कसा स्वीकारू. नाही, या जन्मात तरी नाही."
How can we ever accept ur resignation?
ना, इस जनम में तो नहीं। https://t.co/r7Y3tTcIOZ — Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 15, 2018
केजरीवाल यांच्या आधी आप नेता खासदार संजय सिंह यांनी आशुतोष यांच्या राजीनाम्याबाबत दु:ख व्यक्त केलं होतं. आशुतोष यांनी पुन्हा एकदा विचार करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. तसेच दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय यांनीही आशुतोष यांना भेटून पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला.
संजय सिहं यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "आम्ही सगळे मिळून आशुतोष यांना राजीनामा मागे घेण्याचं आवाहन करु." गोपाल राय यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "आशुतोष यांच्या निर्णयामुळे दु:ख झालं. एकत्र येऊन चर्चा करु."
हम सब मिलकर @ashutosh83B जी से अनुरोध करेंगे की वो अपना फ़ैसला वापस लें।
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) August 15, 2018
पत्रकारिता सोडून राजकारणात आलेल्या आशुतोष यांनी आम आदमी पक्षाला रामराम केला आहे. आशुतोष यांनी आपल्या ट्विटमध्ये, “ प्रत्येक प्रवासाचा कुठेतरी शेवट असतो, आम आदमी पक्षाबरोबर असलेला सुंदर आणि क्रांतिकारक प्रवास आज इथेच संपला आहे. मी माझा राजीनामा स्वीकार करण्याची विनंती पक्षाच्या राजकीय कामकाज समितीला केलीयं.” तर मी वैयक्तिक कारणांमुळे मी राजीनामा देत असल्याचे आशुतोष यांनी स्पष्ट केले. तसेच आशुतोष यांनी ट्विटवरुन आपल्या समर्थकांचे आभार मानले आहेत.
Every journey has an end. My association with AAP which was beautiful/revolutionary has also an end.I have resigned from the PARTY/requested PAC to accept the same. It is purely from a very very personal reason.Thanks to party/all of them who supported me Throughout.Thanks.
— ashutosh (@ashutosh83B) August 15, 2018