एक्स्प्लोर
पाकिस्तानात घुसून लादेनला मारलं जातं तर काहीही शक्य, अरुण जेटलींचं सूचक विधान
2700 कोटींच्या शस्त्र खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. संरक्षण साहित्य खरेदीला तातडीची मंजुरी सरकारकडून देण्यात आली आहे. पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून पुरता बदला घेतला.

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये घुसून लादेनला मारलं जाऊ शकतं तर काहीही शक्य आहे, असे सूचक विधान करु अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. जर अमेरिका कारवाई करू शकते तर भारतालाही हे शक्य आहे असे विधान अरुण जेटली यांनी केले आहे. 2700 कोटींच्या शस्त्र खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. संरक्षण साहित्य खरेदीला तातडीची मंजुरी सरकारकडून देण्यात आली आहे. पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून पुरता बदला घेतला. हवाई दलाने आकाशातून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर केलेल्या हल्लात 350 दशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात हवाई दलाच्या सैनिकांना यश आले आहे. यानंतर भारताकडून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. पाकिस्तानच्या भारतातील घुसखोरीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने तातडीची बैठक बोलावली, यावेळी तीनही सैन्यदलप्रमुखांसह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. एअर स्ट्राईक : देशभरात हाय अलर्ट, मुंबई-अहमदाबादसह प्रमुख शहरांत वाहनांची तपासणी भारतीय वायु सेनेने मंगळवारी पाकिस्तानच्या बालाकोट येथे दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारताची पश्चिमी नौसेना हाय अलर्टवर आहे. तसेच देशभरातील मुंबई-अहमदाबादसह अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शहरांमधील पोलीस सतर्क झाले आहेत. अनेक शहरांमध्ये संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. मुंबई पोलीस, अहमदाबाद पोलीस हाय अलर्टवर आहेत. दोन्ही शहरांमधील पोलीस महामार्गांवर धावणाऱ्या संशयास्पद वाहनांची तपासणी करत आहेत. दरम्यान भारतीय नौसेना हाय अलर्टवर असून कोणत्याही देशविरोधी कारवाईला सामोरी जाण्यास तयार आहे. दरम्यान, भारताने काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा मंगळवारी बदला घेतला. भारतीय हवाई दलाने पाकच्या हद्दीत घुसून 350 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या हल्ल्यानंतर पाकिस्तान बावचळला आहे. काल रात्रीपासून पाकिस्तानी जवान एलओसीवरील रहिवासी परिसरात लपून भारतावर ग्रेनेड हल्ले करत आहेत. पाकिस्तानच्या ग्रेनेड हल्ल्यात भारताचे 5 जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यांना भारतानेदेखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे काही रेंजर्स ठार झाले आहेत. संबंधित बातम्या पाकिस्तानी मीडियात खोट्या बातम्यांचा पाऊस, भारतीय विमानांना धक्काही नाही भारतीय लढावू विमानांना सज्ज राहण्याच्या सूचना, पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक डरपोक पाकड्यांचा डाव उधळला, जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान जम्मू काश्मीरमध्ये भारतीय वायुसेनेचं विमान कोसळलं, दोन वैमानिकांचा मृत्यू पाकिस्तानी विमानांची भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी, बॉम्ब टाकल्याचीही शक्यता एअर स्ट्राईक : देशभरात हाय अलर्ट, मुंबई-अहमदाबादसह प्रमुख शहरांत वाहनांची तपासणी पाकिस्तानचं शेपूट वाकडंच, लोकवस्तीत लपून ग्रेनेड हल्ले, भारताच्या प्रत्युत्तरात पाकचे काही रेंजर्स ठार
आणखी वाचा























