एक्स्प्लोर
अण्णांनी केंद्राच्या मसुद्यात त्रुटी दाखवल्या, उपोषण लांबणार : सूत्र
महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे अण्णांशी चर्चेसाठी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. आज रामलीला मैदानावर जवळपास तासभर अण्णा हजारे आणि गिरीश महाजन यांच्यात चर्चा झाली.
नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्राच्या मसुद्यात अनेक त्रुटी दाखवल्या आहेत. त्यामुळे अण्णा उपोषण मागे घेण्याची शक्यता जवळपास मावळली असून, आंदोलन आणखी लांबण्याची शक्यता आहे. बैठकीतल्या सूत्रांनी एबीपी माझाला यासंदर्भात माहिती दिली.
महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे अण्णांशी चर्चेसाठी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. आज रामलीला मैदानावर जवळपास तासभर अण्णा हजारे आणि गिरीश महाजन यांच्यात चर्चा झाली. केंद्र सरकारने अण्णांच्या मागण्यांवर जो मसुदा तयार केला आहे, तो महाजन यांनी अण्णांपुढे मांडला. मात्र या मसुद्यात अण्णांनी त्रुटी दाखवल्याची माहिती मिळते आहे.
दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून अण्णा हजारे रामलीलावर उपोषणाला बसले आहेत. उपोषणामुळे अण्णांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.
संबंधित बातम्या :
रामलीलावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं आऊटपुट भाजप कार्यालयात?
‘हार्दिक पटेलांच्या वयाच्या दुप्पट अण्णांचं सामाजिक काम’
अण्णा हजारेंच्या आंदोलनावर उद्यापर्यंत तोडगा निघेल : गिरीश महाजन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement