एक्स्प्लोर

आंध्रच्या मुख्यमंत्र्यांचं गिफ्ट, आशा सेविकांचं मानधन तिपटीहून अधिक

जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान सत्तेत आल्यास आशा कार्यकर्त्यांचं मानधन वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं, त्यानुसार तीन हजारांवरुन हे मानधन थेट दहा हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं आहे.

हैदराबाद : जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारताच आरोग्य विभागात कार्यरत आशा कार्यकर्त्यांना खुशखबर दिली आहे. आशा सेविकांचं मानधन तिपटीहून अधिक केलं आहे. आशा सेविकांचं मानधन तीन हजार रुपयांवरुन थेट दहा रुपयांवर नेण्यात आल्यामुळे त्यांना सरसकट सात हजारांचा फायदा होणार आहे. जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान सत्तेत आल्यास आशा कार्यकर्त्यांचं मानधन वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आपल्या शब्दाला जागत रेड्डींनी आशा सेविकांचं मानधन दहा हजारांवर नेलं. तर आंध्र प्रदेशातील ज्येष्ठ नागरिकांना तीन हजारांचं निवृत्तीवेतन देण्याची घोषणाही त्यांनी केली. नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली होती. अंगणवाडी सेविकांचं मानधन तीन हजारांवरुन 4 हजार 500 रुपये करण्यात आलं होतं, तर अंगणवाडी सहाय्यकांचं मानधन दीड हजारांवरुन 2200 रुपये करण्यात आलं होतं. विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसला एकहाती विजय मिळवून देणारे पक्षाचे शिल्पकार वायएस जगनमोहन रेड्डी यांनी गुरुवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. राज्यपाल ईएसएल नरसिम्हा यांनी जगनमोहन रेड्डींना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने 175 पैकी 151 जागा मिळवत तेलुगू देसम पक्षाला धूळ चारली होती. विजयवाड्यातील आयजीएमसी स्टेडियममध्ये वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषात रेड्डींचा शपथविधी पार पडला. जगनमोहन रेड्डींनी तेलुगू भाषेतून शपथ घेतली होती. आंध्र प्रदेशचं विभाजन होऊन तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायुडू मुख्यमंत्री झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही वायएसआर काँग्रेसने आंध्रमधील 25 पैकी 22 जागा मिळवल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget