एक्स्प्लोर
Advertisement
'अमूल' कंपनीकडून उंटाचं दूध बाजारात
उंटाचं दूध सर्वसामान्यपणे प्यायलं जात नसलं, तरी ते पोषक मानलं जातं. त्यामुळेच डेअरी क्षेत्रातील मातब्बर 'अमूल' कंपनीने उंटाचं दूध विक्रीला आणलं आहे.
मुंबई : उंटाच्या दूधाचा वापर फारसा होत नसला तरी 'अमूल' कंपनीने आता उंटाचं दूध बाजारात आणलं आहे. 50 रुपयांना अर्धा लीटर दूध उपलब्ध होणार आहे.
उंटाचं दूध सर्वसामान्यपणे प्यायलं जात नसलं, तरी ते पोषक मानलं जातं. त्यामुळेच डेअरी क्षेत्रातील मातब्बर 'अमूल' कंपनीने उंटाचं दूध विक्रीला आणलं आहे. त्यापूर्वी उंटाच्या दुधाचा तीव्र वास दूर केला जाणार आहे.
गुजरातमधील गांधीनगर, कच्छ, अहमदाबाद या शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर उंटाच्या दूधाची 500 मिलीची पॅकेट्स बाजारात आणली जात आहेत. यापूर्वी उंटाच्या दूधाची चॉकलेट्स अमूलने बाजारात आणली होती. याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने उंटाचं दूधही बाजारात विक्रीला आणलं जात आहे.
काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात दौऱ्यात उंटाच्या दुधाचे उपयोग अधोरेखित केले होते. गुजरातमध्ये उंटाचं दूध गायीच्या दुधापेक्षा दुप्पट किमतीला विकलं जात असल्याचं ते म्हणाले होते. उंटाचं दूध पचण्यास हलकं असल्यामुळे लाभदायक ठरतं. प्रथिन्यांचं प्रमाण अधिक असल्यानं मधुमेहींना ते उपयुक्त ठरतं.
उंटाचं दूध अर्धा लीटरच्या पेट बॉटल्समध्ये विक्रीला उपलब्ध होत आहे. हे दूध थंड ठेवण्याची गरज असते. केवळ तीन दिवसांच्या आत दूध संपवणं अनिवार्य असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement