एक्स्प्लोर
शाहांची कोणतीही रणनीती इथं चालणार नाही : मुख्यमंत्री सिद्धरामय्या
देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता असून आता त्यांनी आपला मोर्चा कर्नाटककडे वळवला आहे. अशावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
![शाहांची कोणतीही रणनीती इथं चालणार नाही : मुख्यमंत्री सिद्धरामय्या Amit Shahs Strategy Will Not Work In Karnataka Said Cm Siddaramaiah Latest Update शाहांची कोणतीही रणनीती इथं चालणार नाही : मुख्यमंत्री सिद्धरामय्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/14113741/SIDDARAMAIAH.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बंगळुरु : 'अमित शाह यांची उत्तर प्रदेशमधील रणनीती कर्नाटक निवडणुकीत चालणार नाही.' असं म्हणत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपला जणू आव्हानच दिलं आहे.
2018मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचं सरकार येईल असा दावा अमित शाह यांनी केला होता. याच वक्तव्याचा समाचार घेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच काँग्रेस निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
'समाजात फूट पाडण्याचा कोणताही प्रयत्न कर्नाटकमध्ये शक्य होणार नाही. कारण की, इथं धर्मनिरपेक्षतेची मूळं खोलवर रुजली आहेत. अमित शाह इथं आले असून त्यांनी निवडणुकीसाठी रणनीती आखली असल्याचं मला समजलं. पण त्यांची कोणतीही रणनीती सफल होणार नाही. आम्ही देखील 40 वर्ष राजकारणात आहोत.' असं सिद्धरामय्या म्हणाले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे तीन दिवस कर्नाटकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी शाह यांनी दावा केला होता की, 'कर्नाटकमध्ये भाजप एकजूट आहे. येडियुरुप्पा यांच्या नेतृत्वात भाजप विधानसभा निवडणुकीत नक्कीच विजय संपादन करुन पुन्हा एकदा सत्तेत येईल.' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
![शाहांची कोणतीही रणनीती इथं चालणार नाही : मुख्यमंत्री सिद्धरामय्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/16171604/AMIT-SHAH-IV-2.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)