एक्स्प्लोर

अमित शाह- मोदींच्या मंत्रिमंडळातले अघोषित नंबर 2

मोदींचा पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा शपथविधी झाला आणि इकडे मंत्रिमंडळात नंबर 2 साठी एक अदृश्य रस्सीखेच सुरु असल्याचं चित्र दिसतं आहे. अमित शाह यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला, त्याच क्षणी आता त्यांचा रोल नंबर 2 च असणार ही चर्चा सुरु होती. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट कमिटीच्या नियुक्त्यांमधेही त्याचीच झलक पाहायला मिळतेय.

नवी दिल्ली : मोदींच्या मंत्रिमंडळात नंबर 2 नेमकं कोण आहे? मोदींचा उजवा हात समजले जाणारे अमित शाह की राजनाथ सिंह? मंत्रिमंडळाच्या निर्मितीपासूनच जी चर्चा सुरु झाली त्यावर कॅबिनेट कमिटीच्या नियुक्त्यांनी शिक्कामोर्तब केलं. आठ पैकी आठही कॅबिनेट समित्यांवर अमित शाह आणि राजनाथ सिंह मात्र केवळ दोनच समित्यांवर. काल पहाटे पाच वाजून 55 मिनिटांनी पीआयबीच्या वेबसाईवटर या कमिट्या जाहीर झाल्या. राजनाथ सिंह यांना दुर्लक्षित केल्याच्या बातम्या मीडियात सुरु झाल्या आणि अवघ्या 16 तासांतच या समित्यांची पुर्नरचना जाहीर करण्यात आली. आधी दोनच समित्यांमध्ये स्थान असणाऱ्या राजनाथ यांना चार समित्या वाढवून एकूण सहा समित्यांवर स्थान देण्यात आलं. अमित शाह यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तेव्हाच हे नक्की झालं होतं की ते मंत्रिमंडळाचे अघोषित नंबर 2 असणार. पहिल्या टर्ममध्ये अमित शाह मंत्रिमंडळात नव्हते, त्यामुळे हा मान राजनाथ सिंह यांच्याकडे राहिला होता. पण त्यावेळचा राजनाथ सिंह यांचा नंबर 2 आणि सध्याचा अमित शाह यांचा नंबर 2 यात खूप फरक आहे. राजनाथ सिंह म्हणायला नंबर 2 असले तरी त्यांना स्वत:च्याच गृहखात्यात फार कमी वाव होता. हे खातं अजित दोभालच चालवतात अशी चर्चा असायची. पण अमित शाह यांच्या काळात मात्र तसं चित्र नाही. शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान मोदींनंतर दुसरी शपथ घेतली ती राजनाथ यांनी, त्यानंतर अमित शाह असा क्रम होता. प्रथेनुसार पंतप्रधानांच्या नंतर शपथ घेणारा मंत्री हा नंबर 2  मानला जातो. पंतप्रधान विदेशात असताना कॅबिनेट मीटिंग घ्यायची वेळ आली किंवा महत्त्वाचा राजकीय निर्णय करावा लागला तरी राजकीय व्यवहार कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनाच स्थान दिलं जातं. त्यामुळेच ज्या राजनाथ सिंह यांनी दुसऱ्या नंबरवर शपथ घेतली, त्यांना केवळ दोनच कॅबिनेट कमिट्यांमध्ये स्थान दिलं जाणं याची मीडियात खूप चर्चा झाली. विशेष म्हणजे राजकीय व्यवहार कमिटीतही आधी त्यांना स्थान दिलं नव्हतं. अमित शाह पहिल्यांदाच लोकसभेत खासदार झाले आहेत, केंद्रात पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. मंत्री नसतानाही देशाच्या राजकीय व्यवस्थेत मोदींनंतर त्यांनाच नंबर 2 म्हणून पाहिलं जात होतं. 2014 मध्ये अमित शाह यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राजनाथ सिंह यांचीच जागा घेतली होती, त्यानंतर नवे गृहमंत्री म्हणूनही त्यांनी राजनाथ सिंह यांची जागा घेतली. मंत्रिमंडळाच्या अधिकृत क्रमवारीत राजनाथ सिंह 2 नंबरवर आणि अमित शाह 3 नंबरवर असले तरी अधिकाराने अमित शाह हेच नंबर 2 असणार हे आता दिसू लागलं आहे. विशेष म्हणजे निवडणुकीआधी ज्या नितीन गडकरींच्या नावाची खूप चर्चा असायची, त्यांनाही या नंबर 2 च्या रेसमध्ये बाजूला ठेवलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Embed widget