एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

राज्यांनी ऑक्सिजनची मागणी नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं; पियुष गोयल यांचं अजब वक्तव्य

देशभरात सध्या कोरोना व्हायरसचं थैमान पाहायला मिळत असून, त्यामध्येच आणखी एका संकटाचीही भर पडताना दिसत आहे. हे संकट म्हणजे ऑक्सिजनचा तुटवडा.

नवी दिल्ली : देशभरात सध्या कोरोना व्हायरसचं थैमान पाहायला मिळत असून, त्यामध्येच आणखी एका संकटाचीही भर पडताना दिसत आहे. हे संकट म्हणजे ऑक्सिजनचा तुटवडा. राज्याराज्यांमध्ये होणारा ऑक्सिजन तुटवडा भरुन काढण्यासाठी म्हणून केंद्र सरकारनंही आता काही महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचअंतर्गत आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. ऑक्सिजन एक्सप्रेस या रेल्वे धावण्यासाठी ग्रीन कॉरिडोर सुरु करण्यात येणार असून, त्या माध्यमातून राज्यांना ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा केला जाणार आहे. 

ऑक्सिजन सिलेंडर आणि टँकर रेल्वेच्या माध्यमातून विविध ठिकाणांवर पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये ग्रीन कॉरिडोरनं मोठी मदतही होणार आहे. 

'नऊ क्षेत्र वगळता 22 एप्रिलपासून तात्पुरती गरज म्हणून औद्योगिक कारणांसाठी होणारी ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा थांबवण्यात येणार आहे. रुग्णालयांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे', असं गोयल म्हणाल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलं. 

कोविडचं संकट येण्यापूर्वी भारतात दर दिवशी 1,000-1,200 मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची गरज लागत होती. पण, 15 एप्रिलला देशात 4795 मेट्रिक टन इतका ऑक्सिजन वापरला गेला; ही वस्तुस्थिती मांडत त्यांनी देशात मागच्या वर्षीपासून ऑक्सिजन निर्मितीचं प्रमाण वाढवण्यात आल्याचं सांगितलं. 

कोरोनाच्या प्रादुर्भावात राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा, पोर्टेबल ऑक्सिजन कॅनला नागरिकांची वाढती मागणी

12 राज्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रत्येत राज्याच्या गरजेनुसार आता, 6177 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. असं असलं तरीही राज्यांनी ऑक्सिजनची गरज नियंत्रणात ठेवणंही तितकंच महत्त्वाचं असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. 

ऑक्सिजनच्या तुटवड्यात एक नवा पर्याय 

महाराष्ट्रात सध्या कोरोनारुग्ण झपाट्याने वाढत असल्याने ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. रुग्णालयात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. अशातच नागरिक खाजगी ऑक्सिजन वितरकांकडून ऑक्सिजन सिलेंडर घेण्यास रांगा लावत आहेत. यात आता नागरिकांसाठी पोर्टेबल ऑक्सिजन कॅनही उपलब्ध होऊ लागले आहेत. या अगोदर परदेशात खेळाडू, गिर्यारोहक हे कॅन ऑक्सिजनची पातळी तातडीने वाढविण्यासाठी वापरत होते. मात्र कोरोना काळात आता या पोर्टेबल ऑक्सिजन कॅनला मोठी मागणी वाढली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSharad Pawar Pritisangam : प्रितीसंगम येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना शरद पवारांकडून अभिवादनTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAnantrao Kalse : एकही आमदार नसल्यानं आणि मतांचा कमी टक्केवारीचा मनसेला फटका?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Embed widget