कोरोनाच्या प्रादुर्भावात राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा, पोर्टेबल ऑक्सिजन कॅनला नागरिकांची वाढती मागणी
कोरोना बाधित रुग्णांची संख्या संपूर्ण देशात वाढली असून त्यामुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. अशातच आता नागरिकांसाठी पोर्टेबल ऑक्सिजन कॅनही उपलब्ध होऊ लागले आहेत. ऑक्सिजनच्या या पोर्टेबल कॅनची मागणी सध्या वाढताना दिसत आहे.
मुंबई : शहरासह राज्यात सध्या कोरोनारुग्ण झपाट्याने वाढत असल्याने ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. रुग्णालयात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा आहे. अशातच नागरिक खाजगी ऑक्सिजन वितरकांकडून ऑक्सिजन सिलेंडर घेण्यास रांगा लावत आहेत. यात आता नागरिकांसाठी पोर्टेबल ऑक्सिजन कॅनही उपलब्ध होऊ लागले आहेत. या अगोदर परदेशात खेळाडू, गिर्यारोहक हे कॅन ऑक्सिजनची पातळी तातडीने वाढविण्यासाठी वापरत होते. मात्र कोरोना काळात आता या पोर्टेबल ऑक्सिजन कॅनला मोठी मागणी वाढली आहे.
ब्रिजो 2 या कंपनीने असे ऑक्सिजन कॅन मोठ्या प्रमाणात बनविण्यास आणि विक्रीस सुरुवात केली आहे. या पोर्टेबल कॅनमध्ये 12 लीटर इतकी ऑक्सिजनची क्षमता असून काही तास रुग्णाला हा कॅन ऑक्सिजन पुरवठा करून ऑक्सिजन पातळी वाढवतो. हा छोटासा कॅन आपण कुठेही बॅगमध्ये, वाहनात घेऊन फिर शकता. तसेच याच्या कॅपला मास्क असल्याने कोणत्याही क्षणी त्याचा वापर तत्काळ करू शकतो. या कॅनला राज्यभरात आता मागणी वाढत आहे.
महानगरपालिकेच्या 6 रुग्णालयांमधील 168 कोरोना बाधित रुग्णांचे स्थलांतर
कोरोना बाधित रुग्णांची संख्या संपूर्ण देशात वाढली असून त्यामुळे रुग्णांना प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठा करण्याची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहा रुग्णालयांमधील 168 रुग्णांचे ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या इतर कोविड रुग्णालयांमध्ये सुरक्षितरित्या स्थलांतर करण्यात आले आहे. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व 24 प्रशासकीय विभागात प्राणवायू पुरवठा सुरळीत राखता यावा म्हणून, अन्न व औषध प्रशासन तसेच ऑक्सिजन उत्पादक आणि संबंधित सहायक आयुक्त यांच्यासमवेत समन्वय साधण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने सहा समन्वय अधिकारी नुकतेच नियुक्त करण्यात आले आहेत. हे समन्वय अधिकारी 24x7 या स्वरूपात कार्यरत राहणार आहेत. यामुळे ऑक्सिजन पुरवठ्या बाबतची अडचण लागलीच निकाली निघण्यास मोलाची मदत होत आहे. भविष्यातही ऑक्सिजन पुरवठ्या संबंधी अशी कोणतीही अडचण उद्भवणार नाही, याची पूर्ण खबरदारी महानगरपालिका प्रशासनाने घेतली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mumbai Corona : महानगरपालिकेच्या 6 रुग्णालयांमधील 168 कोरोना बाधित रुग्णांचे स्थलांतर, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे प्रशासनाचा निर्णय
- Corona Fake Reports | नवी मुंबईत 300 च्या वर बोगस कोरोना रिपोर्ट बनविणाऱ्या तीन जणांना अटक
- Mumbai Coronavirus : मुंबई महापालिकेकडून मायक्रो कंटेन्मेंट झोन, 1169 इमारती आणि 10, 997मजले सील