अॅमेझॉन इंडियाकडून तब्बल 20 हजार लोकांना तात्पुरत्या स्वरुपात रोजगार; 'या' शहरांत संधी
अॅमेझॉन इंडियाकडून तब्बल 20 हजार लोकांना तात्पुरत्या स्वरुपात रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुढिल सहा महिन्यांत होणारी ग्राहकांच्या मागणीतील वाढ लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : दिग्गज ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅमेझॉन इंडिया कंपनीने रविवारी सांगितले की, कंपनीकडून भारत आणि इतर देशांमध्ये ग्राहकांच्या मदतीसाठी ग्राहक सेवा विभागात अॅमेझॉन 20 हजार लोकांना तात्पुरत्या स्वरुपात रोजगार देणार आहे. भारत आणि जगभरातील इतर ग्राहकांनी कोणत्याही व्यत्ययाविना सेवा देता यावी म्हणून अॅमेझॉन नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे.
कोणत्या शहरात उपलब्ध होणार संधी?
कंपन्यांनी सांगितल्यानुसार, कर्मचाऱ्यांच्या करण्यात येणाऱ्या नियुक्त्या ग्राहकांची वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी करण्यात येणार आहेत. कंपनीचा असा अंदाज आहे की, पुढिल सहा महिन्यांत साईटवरील ग्राहकांची रहदारी वाढणार आहे, त्यासाठी आधीच तायारी करण्यात येणार आहे. पुढिल सहा महिन्यांच्या कालावधीत देशभराती काही शहरांमध्ये नव्या कामगाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. हैदराबाद, पुणे, कोईम्बटूर, नोएडा, जयपूर, कोलकाता, चंदिगढ, मंगलुरु, इंदोर, भोपाळ आणि लखनऊ या शहरांमध्ये अॅमेझॉन नव्या कामगारांना रोजगार देणार आहे.
बहुतेक पदं 'वर्चुअल ग्राहक सेवा' कार्यक्रमाचा भाग
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 20 हजार पदांपैकी अनेक पं अॅमेझॉनच्या 'वर्चुअल ग्राहक सेवा' कार्यक्रमाचा हिस्सा असतील. यामुळे कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. या पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास आहे. तसेच अर्जदाराला हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगु आणि कन्नड यांसारख्या भाषांचे ज्ञान असणं आवश्यक आहे. या व्यक्ती ईमेल, सोशल मीडिया किंवा फोनद्वारे ग्राहकांना मदत करणार आहेत.
अॅमेझॉन इंडियाचे संचालक अक्षय प्रभु यांनी सांगितलं की, 'आम्ही सतत वाढणाऱ्या ग्राहकांच्या गरजा पुरवण्यासाठी वाढत्या मागणीचे निरंतर मूल्यांकन करीत आहोत. पुढील सहा महिन्यांत ग्राहकांची संख्या वाढेल असा आमचा अंदाज आहे.'
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
