एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देशभरातील डॉक्टर संपावर, विविध मागण्यांसाठी एल्गार, राज्यातील वैद्यकीय सेवांवर परिणाम
मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमधील 200 डॉक्टर्स आज संपावर आहेत. बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉक्टर्सने हॉस्पिटलबाहेर रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी करत कोलकातामध्ये ज्युनिअर डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवला.
मुंबई : कोलकातामध्ये ज्युनिअर डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा निषेधार्थ आज इंडियन मेडिकल असोसिएशनने आज देशव्यापी संप पुकारला आहे. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा करा, डॉक्टरांना सुरक्षा पुरवा अशा मागण्या करत हा संप पुकारण्यात आलाय. या बंदामुळे मुंबईसह दिल्ली, भोपाळ, रोहतक याठिकाणीही वैद्यकीय सेवांवर याचा परिणाम झाला आहे.
आज सकाळी सहा वाजल्यापासून सुरू झालेला संप उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक हॉस्पिटल्स, क्लिनिक, एक्स रे-सिटी स्कॅन सेंटर आज बंद आहेत. मुंबईत हिंदुजा हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल, होली स्पिरीटमधील शेकडो डॉक्टर्स संपावर आहेत.
मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमधील 200 डॉक्टर्स आज संपावर आहेत. बॉम्बे हॉस्पिटलमधील डॉक्टर्सने हॉस्पिटलबाहेर रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी करत कोलकातामध्ये ज्युनिअर डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवला. राज्यातील अनेक हॉस्पिटल्स, क्लिनिक, एक्स रे-सिटी स्कॅन सेंटर आज बंद आहेत. पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हा संप आला आहे.
तर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. हिंसेचा मार्ग अवलंबणे योग्य नसून डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकारनेही ठोस पावले उचलणे अत्यावश्यक आहे, असे मतं राज्य रेडिओलॉजी अॅण्ड इमेजिंग संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत ओनकर यांनी मांडले आहे.
All India doctors strike | राज्यातील अनेक हॉस्पिटल्स, क्लिनिक बंद, वैद्यकीय सेवांवर परिणाम | ABP Majha
डॉक्टरांवर संपाची वेळ का आली? काय आहे प्रकरण ?
सोमवारी नील रतन सिराकर मेडिकल कॉलेजमध्ये(एनआरएसएससी) उपचारादरम्यान एका 75 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी मोठ्या जमावासह रुग्णालयात घुसून कनिष्ठ डॉक्टरांना मारहाण केली. या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील निवासी तसेच कनिष्ठ डॉक्टरांनी आंदोलन उभारले आहे.
हे आंदोलन चिघळण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. बॅनर्जी यांनी आंदोलक डॉक्टरांना आंदोलन मागे घेण्यासाठी 4 तासांचा अल्टिमेटम दिला होता. आंदोलन मागे न घेतल्यास जबरदस्त अॅक्शन घेण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळेच हे आंदोलन चिघळल्याचे बोलले जात आहे.
संबंधित बातम्या
राज्यातील निवासी तसेच इंटर्न डॉक्टरांचे आज आंदोलन, कोलकात्यात डॉक्टरांना मारहाणीच्या घटनेचा निषेध
ममतांच्या अल्टीमेटमनंतरही चौथ्या दिवशी डॉक्टरांचे आंदोलन सुरुच, देशभरात पडसाद
ममतांच्या अल्टीमेटमनंतरही चौथ्या दिवशी डॉक्टरांचे आंदोलन सुरुच, देशभरात पडसाद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
करमणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement