एक्स्प्लोर

नक्षल कनेक्शन : धाडी, अटक ते नजरकैद, आतापर्यंत काय काय झालं?

"मतभेद असणं हा लोकशाहीचा सेफ्टी व्हॉल्व आहे. जर मतभेद असण्याची परवानगी नसेल तर प्रेशर कूकरप्रमाणे स्फोटही होऊ शकतो."

मुंबई : नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याच्या संशयाखाली अटक केलेल्या पाच जणांना कोठडीत न ठेवता नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर सर्व संशयित आरोपींना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईला मोठा धक्का बसला आहे. वरवर राव, अरुण फरेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि व्हर्नन गोन्साल्विस यांना वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत पुणे पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी दोन दिवसात आपली बाजू मांडण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सहा सप्टेंबर रोजी होणार आहे. पुणे पोलिसांची छापेमारी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली 28 ऑगस्ट 2018 रोजी देशभर संशयितांवर कारवाई सुरु झाली. पुणे पोलिसांच्या सहा पथकांकडून मुंबई, दिल्ली, हैदराबाद, रांची आणि हरियाणा या शहरांमध्ये छापेमारी केली. पाच जणांना अटक या छापेमारीनंतर पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली. प्रसिद्ध कवी वारावर राव यांना हैदराबादमधून अटक केली. ठाण्यातून अरुण फरेरा आणि मुंबईत व्हर्नोन गोन्साल्वीस यांच्या घरांची झाडाझडती घेऊन त्यांनाही अटक करण्यात आली. मानवाधिकार कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांच्या रांचीमधून, तर दिल्लीमधून गौतम नवलखा यांना अटक करण्यात आली. आरोप काय आहे? पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवार वाड्यावर एल्गार परिषद पार पडली होती. या परिषदेत जे लोक सहभागी झाले होते, त्यांच्या घरांची झडती घेतली जात आहे. या एल्गार परिषदेला माओवाद्यांनी पैसे पुरवले होते, असे पुणे पोलिसांनी न्यायालयात सांगितलं होतं. त्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकांनी देशभरात विविध ठिकाणी छापे मारले. अटक केलेले सर्वजण नक्षलवाद्यांसाठी शहरी भागात थिंक टँक म्हणून काम करत होते, असा पोलिसांना संशय आहे. तसेच, विद्यार्थ्यांना भडकवणे, शस्त्र जमा करणे, दहशतवादी कृत्यात सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आहे. विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या घातपात करण्याचा कट असल्याचंही आढळून आलं. लॅपटॉप, हार्डडिस्कसह अनेक साहित्य आणि पुरावे मिळाले आहेत. कबीर कला मंचाने पैसे पुरवले असून देशातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला करण्याची तयारी सुरु केली असल्याचं तपासात पुढे आलं, अशी माहिती पुणे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडेंनी दिली. कोणते कलम लावण्यात आलेत? अटक केलेल्या पाचही जणांवर आयपीसीच्या कलम 153 अ, 505(1)ब, 117, 120 ब, 13, 16, 18, 20, 38, 39, 40 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. छाप्यातून काय जप्त केले? मानवाधिकार कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल जप्त करण्यात आले, तसेच सोशल मीडिया अकाऊंट्सचे पासवर्डही पोलिसांनी मागून घेतले. सुधा भारद्वाज यांची मुलगी मायशा हिने याबाबत एएनआयला माहिती दिली. तसेच, या छाप्यातून महत्वाची कागदपत्र, पुस्तकं, पत्रं आणि इतर साहित्य जप्त केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांना सापडलेल्या पत्रात काय आहे? काही दिवसांपूर्वी रोना विल्सन यांच्या घरी टाकलेल्या धाडीत नक्षलवाद्यांचं पत्र हाती लागल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्याच आधारे देशभरात 9 ठिकाणी चौकशीसत्र करण्यात आलं, त्यातील 5 ठिकाणांहून 5 जणांना अटक करण्यात आली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या पत्रात मोदींना संपवण्यासाठी राजीव गांधींच्या हत्येसारखीच पुनरावृत्ती करण्याचा उल्लेख आहे. शिवाय, 4 लाख राऊंड फायर करण्याची क्षमता असलेलं M4 हे शस्त्र खरेदी करण्याचा प्लॅन या पत्रात आहे. त्यासाठी 8 कोटींची गरज असल्याचं म्हटलं आहे, अशी माहिती पत्रात असल्याचा पोलिसांचा दावा आहे. अटकेविरोधात सुप्रिम कोर्टात याचिका या पाच जणांच्या अटकेविरोधात रोमिला थापर, देवकी जैन, प्रभात पटनायक, सतीश देशपांडे आणि माजा दारुवाला यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्येष्ठ वकील आणि काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी त्यांची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली. त्यांच्यासोबत प्रशांत भूषण, दुष्यंत दवे, वृंदा ग्रोवर हेदेखील होते. अभिषेक मनु सिंघवी यांनी काय युक्तीवाद केला? देशभरातून अटक झाली आणि आरोपपत्र मराठीत आहे. परंतु या पाच जणांचं नाव आरोपपत्रात नाही. अचानक नऊ महिन्यांनंतर यांना अटक का झाली, याचं कारण सांगायला हवं. त्यांच्यावर पुराव्यांशी छेडछाड करण्याचा धोका नाही आणि तपासात असहकार्य करण्याची भीतीही नाही. त्यामुळे त्यांना अटक होऊ शकत नाही. हे सगळे सामान्य नागरिक आहेत आणि ते भीमा-कोरेगावमध्ये उपस्थित नव्हते, असा युक्तीवाद अभिषेक मनु सिंघवी कोर्टात केला. पाच जणांना कोर्टात नेल्यावर तिथे काय झालं? नक्षली कनेक्शनच्या संशयातून ज्या पाच जणांना पुणे पोलिसांनी अटक केली त्यावरील सुनावणीत सुप्रीम कोर्टानं  पोलिसांना मोठा धक्का दिला. अटकेत असलेल्या पाचही जणांना कोठडीत न ठेवता त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. त्यानंतर पुणे पोलिसांच्या ताब्यातील 3 आरोपींची घरी रवानगी करण्यात आली. शिवाय पुढच्या सुनावणीत महाराष्ट्र सरकारला उत्तर देण्याचे आदेशही कोर्टाने दिले. या प्रकरणावर टिप्पणी करताना सुप्रीम कोर्टने म्हटलं आहे की, "मतभेद असणं हा लोकशाहीचा सेफ्टी व्हॉल्व आहे. जर मतभेद असण्याची परवानगी नसेल तर प्रेशर कूकरप्रमाणे स्फोटही होऊ शकतो." पोलिसांच्या कारवाईचा 37 संघटनांकडून निषेध पुणे पोलिसांनी केलेल्या पाच जणांच्या अटकेच्या विरोधात काल मुंबईत 37 संघटनांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. खोट्या आरोपांखाली पाच जणांचं अटकसत्र करण्यात आलं असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. यावेळी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, सामाजिक कार्यकर्त्या हसीना खान उपस्थित होत्या. परवा केलेल्या छापासत्रात आनंद तेलतुंबडे यांच्या पुण्यातल्या निवासस्थानीही छापेमारी करण्यात आली होती. याचाही यावेळी निषेध करण्यात आला. देशभरातून अटकेच्या कारवाईवर टीकास्त्र “भारतात केवळ एकाच एनजीओला जागा आहे आणि तिचे नाव आरएसएस आहे. इतर सर्व एनजीओ बंद करुन टाका. सर्व कार्यकर्त्यांना तुरुंगात पाठवा आणि जे लोक तक्रार करतात, त्यांना गोळ्या मारा. न्यू इंडियामध्ये तुमचं स्वागत.” - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी “सुधा भारद्वाज या हिंसा आणि अवैध गोष्टींपासून तेवढ्या दूर आहेत, जेवढे अमित शाह त्या गोष्टींच्या जवळ आहेत.” - प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा “भीमा-कोरेगावमध्ये आयोजित कार्यक्रमाचं यश भाजप सरकारला पाहावत नाही. म्हणून हिंसा पसरवली गेली आणि आता त्या आडून दलित आणि आदिवासींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे.” – बसप अध्यक्षा मायावती “नक्षलवादाचा आरोप ठेवत केलेली पाच जणांची अटक दुर्देवी असून, महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेल्या काही जणांना आपण वैयक्तिक ओळखतो. डावी विचारसरणी असलेल्या लोकांवर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप चुकीचा.” – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संबंधित बातम्या : नक्षली संबंध : पाचही आरोपींना नजरकैदेत ठेवा : सुप्रीम कोर्ट मोदींच्या हत्येचा कट आखल्याप्रकरणी देशभरात धाडसत्र, पोलिसांच्या हाती पत्र 'त्या' पाच आरोपींचे काश्मिरी फुटीरतावाद्यांशी संबंध : पुणे पोलिस एल्गार परिषद : नक्षली कनेक्शनप्रकरणी पाच जणांना अटक एल्गार परिषद: नक्षली कनेक्शनवरुन अटकसत्र

महत्त्वाच्या बातम्या

नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा हाय होल्टेज ड्रामा, राहुल गांधी पुन्हा गनिमी काव्याने निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार
दिल्लीत पुन्हा हाय होल्टेज ड्रामा, राहुल गांधी पुन्हा गनिमी काव्याने निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकणार
PM Modi: पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले..
पद, प्रतिष्ठा जगात कुठेही मिळेल, मात्र भारतासारखी पुण्यभूमी कुठेही नाही; आत्मनिर्भर भारत ते ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हबपर्यंत पंतप्रधान मोदींनी विकसित भारताचा रोडमॅप सांगितला, म्हणाले, We will do it!
Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?

व्हिडीओ

Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
Rupali Patil Thombare: हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
Manoj Jarange Patil and Ajay Baraskar: मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
Smriti Mandhana: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Video: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
Sunetra Pawar: अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही, एकदा बाहेर ते कायमचे बाहेर! सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा
अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही, एकदा बाहेर ते कायमचे बाहेर! सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा
Embed widget