एक्स्प्लोर
Advertisement
सनी देओलचा गुरुदासपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल, सनीकडे आहे 'इतकी' संपत्ती
बॉलिवूड अभिनेता सनी देओलने आज पंजाबच्या गुरुदासपूर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी सनीने त्याच्या प्रतिज्ञापत्रात त्याच्याकडील स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती दिली आहे.
अमृतसर : बॉलिवूड अभिनेता सनी देओलने आज पंजाबच्या गुरुदासपूर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी सनीने त्याच्या प्रतिज्ञापत्रात त्याच्याकडील स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती दिली आहे. सनीकडे एकूण 87 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच त्याने 53 कोटी रुपयांचे कर्जदेखील घेतलेले आहे.
सनीकडे 60 कोटी रुपयांची जंगम आणि 21 कोटी रुपयांची स्थावर संपत्ती आहे. त्याच्या बँक खात्यात 35 लाख रुपयांची रोकड आहे. सनीची पत्नी पूजा देओल यांच्याकडे 6 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. पूजा यांच्या दोन बँक खात्यांमध्ये 19 लाख आणि 16 लाख रुपयांची रोकड आहे.
सनीने त्याचे खरे नाव अजय सिंह देओल या नावाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज भरताना सनीसोबत केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह आणि जितेंद्र सिंह तसेच सनीचा धाकटा भाऊ आणि अभिनेता बॉबी देओल उपस्थित होते.
सनी देओलकडे त्याची सावत्र आई आणि खासदार हेमामालिनी यांच्या तुलनेत खूप कमी संपत्ती आहे. हेमामालिनी यांच्याकडे 249 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
VIDEO | मुंबईतील सेलिब्रिटींचं चौथ्या टप्प्यासाठी हाऊसफुल्ल मतदान | स्पेशल रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
धाराशिव
निवडणूक
निवडणूक
Advertisement