(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Air India Urination Row : प्रवासी महिलेवर लघुशंका प्रकरणी एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड, पायलटचं लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित
Air India Urination Incidence : डीजीसीएने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. विमानाच्या पायलटने आपली जबाबदारी व्यवस्थित पार न पाडल्याने पायलटला तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
Air India Urination Incidence : एअर इंडियाच्या (Air India) विमानात प्रवासी महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचं प्रकरणी वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एवढेच नाही तर विमानाच्या पायलटचे लायसन्स देखील तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
डीजीसीएने (DGCA) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. विमानाच्या पायलटने आपली जबाबदारी व्यवस्थित पार न पाडल्याने पायलटला तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच विमानाच्या डायरेक्टरला तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एअर इंडियाच्या विमानात महिलेच्या अंगावर लघवी करणारा आरोपी शंकर मिश्रा याला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच एअर इंडियाने शंकर मिश्राला चार महिन्याची बंदी घातली होती. घटना झाल्यानंतर पोलिसांनी 42 दिवसांनी त्याला अटक केली होती.
शंकर मिश्राची कंपनीकडून हकलपट्टी
शंकर मिश्रावरील गंभीर आरोपांमुळे तो काम करत असलेली कंपनी वुल्फ फार्गोने त्याला नोकरीवरुन काढून टाकलं होतं. कंपनीच्या वतीने एक निवेदन जारी करताना म्हटलं होतं की, कंपनी आपल्या कर्मचार्यांकडून व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या योग्य वर्तनाची अपेक्षा करते. शंकर यांच्यावरील आरोप अत्यंत खेदजनक असून त्यामुळे त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात येत आहे. या तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करु, असंही कंपनीनं म्हटलं आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
अमेरिकेहून दिल्लीला येणाऱ्या एका विमानात मद्यधुंद व्यक्तीने एका 70 वर्षीय महिलेच्या अंगावर लघुशंका केली. ज्येष्ठ महिलेने या संदर्भात केबिन क्रू ला माहिती दिली आहे. त्यानंतर देखील त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची चौकशी महिलेने टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पत्र लिहिल्यानंतर सुरु झाली. महिलेने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मद्यधुंद अवस्थेत असलेला प्रवासी माझ्यासमोर आला, त्याने माझ्यासमोर लघुशंका केली. क्रू मेंबरकडून देखील घेण्यात आली नाही. मला क्रू मेंबरकडून प्रतिसाद उशिरा मिळाला. लघुशंका केल्यामुळे माझे कपडे आणि इतर वस्तू खराब झाल्या. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला. तर या महिलेने शंकर मिश्रा याच्याकडून काही पैसे उकळले असून ती ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप शंकर मिश्रा यांच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: