विमानात महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी करणारा शंकर मिश्रा 'असा' सापडला पोलिसांच्या जाळ्यात, जाणून घ्या नेमकं काय घडलं त्या दिवशी
Man Arrested For Urinating on Female Passenger : 3 जानेवारी रोजी दिल्ली पोलिसांना आरोपी शंकर मिश्राचे शेवटचे लोकेशन बेंगळुरूमध्ये सापडले होते. त्यानंतर शंकरने 3 जानेवारीलाच त्याने आपला मोबाईल बंद केला. यादरम्यान शंकर बंगळुरूमध्ये प्रवास करण्यासाठी टॅक्सीचा वापर करत होता.
Man Arrested For Urinating on Female Passenger : एअर इंडियाच्या विमानात ( Air India flight) एका महिला सहप्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याप्रकरणी शंकर मिश्रा (Shankar Mishra) या आरोपीला आज दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या शंकर मिश्राच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी शंकर मिश्रा याला बंगळुरू येथून अटक केली आहे. सतत ठिकाण बलदत असल्याने त्याला शोधण्याचं पोलिसांसमोर आव्हान होतं. परंतु, पोलिसांनी आपल्या मास्टर प्लॅनचा वापर करून शंकर मिश्रा याला अटक केली.
26 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला येणाऱ्या फ्लाइटमध्ये बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत असताना शंकर मिश्रा याने एका महिला सहप्रवाशासोबत गैरवर्तन केले होते. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शंकर मिश्रा याने प्रवासादरम्यान एका 70 वर्षीय महिला प्रवाशावर लघवी केली होती. याप्रकरणी डीजीसीएने कठोर पावले उचलली असून एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. मद्यधुंद अवस्थेत महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी मिश्रा याच्यावर यापूर्वीच 30 दिवसांची विमान प्रवास बंदी घालण्यात आली आहे.
Man Arrested For Urinating on Female Passenger : असा लावला शंकर मिश्राचा छडा
3 जानेवारी रोजी दिल्ली पोलिसांना आरोपी शंकर मिश्राचे शेवटचे लोकेशन बेंगळुरूमध्ये सापडले होते. त्यानंतर शंकरने 3 जानेवारीलाच त्याने आपला मोबाईल बंद केला. यादरम्यान शंकर बंगळुरूमध्ये प्रवास करण्यासाठी टॅक्सीचा वापर करत होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शंकर मिश्रा हा त्याच्या बेंगळुरू येथील कार्यालयात कोठून जायचा यासह त्याचा रोज ये-जा करण्याच्या रस्त्यावर पोलिसांनी नजर ठेवली. यासोबतच त्याच्या रोजच्या प्रवासाच्या हिस्ट्रीचा पोलिसांनी तपास केला. या सर्व प्रयत्नानंतर काल रात्री उशिरा दिल्ली पोलिसांना शंकर मिश्रा याचे म्हैसूरमधील लोकेशन मिळाले. लोकेशन मिळतात पोलिस तेथे पोलोचले. मात्र पोलिस तेथे पोहोचेपर्यंत शंकर मिश्रा टॅक्सीतून उतरून निघून गेला होता. यानंतर पोलिसांनी टॅक्सी चालकाकडे चौकशी केली. त्यावेळ चालकाकडून त्याच्याबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मिश्राला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी शंकरला अटक करण्यात आली होती तिथे तो याआधीही अनेकवेळा राहिला होता. त्यामुळे दिल्ली पोलीस तेथे पोहोचले आणि त्यानंतर त्याला पकडण्यात यश आले.
Man Arrested For Urinating on Female Passenger : नक्की काय घडलं त्या दिवशी?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या विमानात आपल्या सहप्रवाशावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शंकर मिश्रा याने लघवी केली होती. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला होता. परंतु, सतत ठिकाणं बदलत शंकर मिश्रा पोलिसांना गुंगारा देत होता. आरोपी शंकर मिश्रा याच्या वडिलांचं पालघर मधील बोईसर येथे हॉटेल आहे. शंकर मिश्रा कॅलिफोर्नियामध्ये मुख्यालय असलेल्या वेल्स फार्म या अमेरिकन बहुउद्देशीय वित्तीय सेवा इंडिया चापटर कंपनीचा उपाध्यक्ष देखील आहे. या घटनेने शंकर मिश्रा यांच्या कुटुंबाला देखील मोठा धक्का बसला असून हे आरोप बिनबुडाचे असल्याचं शंकर मिश्रा यांच्या वडिलांनी म्हटलं आहे. तर या महिलेने शंकर मिश्रा याच्याकडून काही पैसे उकळले असून ती ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप शंकर मिश्रा यांच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या