Air India Flight:एअर इंडियाचे न्यूयॉर्क-दिल्ली विमान लंडनला वळवले, मेडिकल इमर्जन्सीमुळे घेणयात आला निर्णय
Air India Flight: एअर इंडियाचे न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइट (AI-102) सोमवारी मेडिकल इमर्जन्सीमुळे लंडनकडे वळवण्यात आली आहे.
Air India Flight: एअर इंडियाचे न्यूयॉर्क-दिल्ली विमान (AI-102) सोमवारी मेडिकल इमर्जन्सीमुळे लंडनकडे वळवण्यात आली आहे. ऑनलाइन उपलब्ध माहितीनुसार, AI-102 रात्री 11.25 च्या सुमारास इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणार होते. ट्रॅकिंग डेटानुसार, नॉर्वेमध्ये प्रवास करत असताना विमान लंडनकडे वळवण्यात आले. यापूर्वी सोमवारी बॉम्बच्या धमकीनंतर दिल्लीहून देवगडला जाणारे इंडिगोचे (indigo airlines) विमान लखनौला वळवण्यात आले होते. धमकीचा कॉल अफवा असल्याचे निष्पन्न झाल्याने विमानाला नंतर उड्डाणासाठी मंजुरी देण्यात आली.
Air India Flight: एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाही अडचण
तत्पूर्वी रविवारी दुबईहून () येणाऱ्या एअर इंडिया (Air India) एक्स्प्रेसच्या विमानाने लँडिंग करताना पायलटला काही समस्या आल्यानंतर तिरुअनंतपुरमच्या विमानतळावर मदत मागितली होती. विमानतळाच्या एका सूत्राने पीटीआयला (PTI) सांगितले की, लँडिंग दरम्यान पायलटला अस्वस्थता जाणवली आणि त्याने एटीसीकडे मदत मागितली. सकाळी 6.30 च्या नियोजित वेळेवर हे सामान्य लँडिंग होते. यातच वैमानिकाने कोणत्याही इमर्जन्सी परिस्थितीची घोषित केलेली नाही. वैमानिकाने म्हटले आहे की, IX540 एअर इंडिया (Air India) एक्सप्रेस विमान लँडिंगनंतर तपासले असता, विमानाच्या (Flight) गियरच्या एका चाकाचा वरचा थर डी-कॅप केलेला असल्याचे आढळून आले होते.
#UPDATE | AI-102 from New York to New Delhi has been diverted to London due to a medical emergency onboard. Our ground staff at Heathrow have been alerted and preparations have been made to evacuate the individual concerned to hospital: Air India official to ANI pic.twitter.com/dOOueecnoM
— ANI (@ANI) February 20, 2023
Air India Flight: इंडिगो फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी
दरम्यान, यापूर्वी बॉम्बच्या धमकीनंतर दिल्लीहून (Delhi) देवगडला जाणारे इंडिगोचे (indigo airlines) विमान (Flight) लखनौला वळवण्यात आले होते. धमकीचा कॉल अफवा असल्याचे निष्पन्न झाल्याने विमानाला नंतर उड्डाणासाठी मंजुरी देण्यात आली. एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे की, सर्व आवश्यक सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले गेले आणि विमानाला उड्डाणासाठी मोकळं करण्यात आलं. इंडिगो (indigo airlines) तपासात सुरक्षा यंत्रणांच्या नियमांचे पालन करत आहे. चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळाने सांगितले की, विमान दुपारी 12:20 वाजता सुरक्षितपणे उतरले आणि त्याला आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले. विमानतळ सुरक्षेने धोक्याची पुष्टी करण्यासाठी आवश्यक तपासण्या केल्या आणि योग्य तपासणीनंतर विमानाला उड्डाणासाठी मंजुरी देण्यात आली.