(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Robotic Surgery : दिल्लीतील एम्समध्ये होणार रोबोटिक शस्त्रक्रिया, कॅम्पसमध्ये डॉक्टरांना दिलं जाईल प्रशिक्षण
AIIMS Robotic Surgery : दिल्ली एम्समध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यासाठी कॅम्पसमध्ये डॉक्टरांना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. एम्सने या संदर्भात एक पत्रक जारी करत माहिती दिली आहे.
AIIMS Robotic Surgery : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (All India Institute Of Medical Science) म्हणजेच दिल्ली एम्स (AIIMS) रुग्णालयात लवकरच रोबोटिक शस्त्रक्रिया (Robotic Surgery) सुरु करण्यात येणार आहे. यासाठी कॅम्पसमध्ये डॉक्टरांना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. एम्सने या संदर्भात एक पत्रक जारी करत माहिती दिली आहे. यासाठी लवकरच कॅम्पस डॉक्टरांचं प्रशिक्षण सुरु करण्यात येणार आहे.
AIIMS Robotic Surgery : दिल्लीतील एम्समध्ये होणार रोबोटिक शस्त्रक्रिया
दिल्ली एम्समध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. एम्सने याबाबत माहिती देत जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "रोबोटिक शस्त्रक्रियेच्या प्रशिक्षणासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. रोबोटद्वारे शस्त्रक्रिया ही वैद्यकीय तंत्रज्ञानातील अत्याधुनिक पद्धत आहे. एम्सने हे तंत्रज्ञान स्वीकारलं आहे." (AIIMS Delhi to set up Robotic Surgery Training Facility)
AIIMS Robotic Surgery : कॅम्पसमध्ये डॉक्टरांना दिलं जाईल प्रशिक्षण
रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी प्रशिक्षित प्राध्यापकांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचं एम्सने म्हटलं आहे, त्यासाठी कॅम्पसमध्ये डॉक्टरांना प्रशिक्षण दिलं जाईल. रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणाली तयार करणाऱ्या जागतिक प्रशिक्षकांना ट्रेनिंगसाठी बोलावण्यात आलं आहे. एम्समध्ये प्रशिक्षणासाठी इतर सर्व आवश्यक गोष्टींसह सुमारे 500 चौरस फूट जागा उपलब्ध करण्यासाठी तयार सुरु आहे.
AIIMS, New Delhi to establish a robotic surgery training facility to ensure adequate availability of trained experts, provide innovative minimally invasive surgery and establish other such centres in the country pic.twitter.com/zRawTWfSgt
— AIIMS, New Delhi (@aiims_newdelhi) March 3, 2023
AIIMS Robotic Surgery : एम्स कॅम्पसमध्ये सर्व प्रशिक्षण सुविधा तयार करणार
एम्सने म्हटले आहे की, "रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणाली तयार करणाऱ्यांना उत्पादकांना आमंत्रित करण्यासाठी एक EOI जारी करण्याची आवश्यकता आहे. यामुळे AIIMS कॅम्पसमध्ये सर्व प्रशिक्षण सुविधा तयार करता येतील. एम्सच्या संचालकांनी यासाठी तीन ते सहा महिन्यांची मुदत दिली आहे."
AIIMS Robotic Surgery : जागतिक दर्जाची सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील
दिल्ली एम्सच्या यूरोलॉजी विभागाचे प्रोफेसर अमलेश सेठ यांनी सांगितलं की, "रोबोटिक सर्जरी हे आधुनिक तंत्रज्ञान आहे. एम्सची वैद्यकीय क्षमता वाढवण्यासाठी आम्ही यावर काम करत आहोत. आम्ही जागतिक दर्जाची रोबोटिक शस्त्रक्रिया प्रशिक्षण सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, ज्याचा फायदा देशातील डॉक्टरांना होईल."
महत्त्वाच्या इतर बातम्या :