एक्स्प्लोर

Ahmedabad serial blast : 5 दोषी यूपीच्या आझमगडचे, मास्टरमाइंड अबू बशर शेखचाही समावेश

अहमदाबाद सीरियल बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने मोठा निकाल दिला.

Ahmedabad serial blast: अहमदाबाद सीरियल बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष न्यायालयाने मोठा निकाल दिला. निकाल देताना न्यायालयाने 49 पैकी 38 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्याच वेळी, अन्य 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरलेल्या 49 पैकी सात यूपीचे आहेत.


यूपीमधील आझमगडमधील पाच दोषी
शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींपैकी पाच जण उत्तर प्रदेशातील पूर्व जिल्ह्यातील आझमगड येथील रहिवासी आहेत. या पाच नावांमध्ये दहशतवादी मास्टरमाइंड अबू बशर शेख याच्या नावाचाही समावेश आहे. दहशतवादी नेता अबू बशर शेख व्यतिरिक्त, आझमगढच्या इतर दोषींमध्ये मोहम्मद आरिफ मिर्झा, मोहम्मद सैफ शेख, झिशान अहमद आणि सैफ-उर-रहमान अन्सारी यांचा समावेश आहे.

'दहशतवादी केंद्र'
उत्तर प्रदेशातील इतर जिल्ह्यातील तीन लोकांमध्ये मेरठचा झिया-उर-रहमान, बुलंदशहरचा मोहम्मद शकील लुहार आणि बिजनौरचा तन्वीर पठाण यांचा समावेश आहे. मात्र, आझमगडमधील तीन रहिवासी मोहम्मद हबीब फलाही, मोहम्मद साकीब आणि मोहम्मद झाकीर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 2008 च्या बाटला हाऊस एन्काउंटर आणि गुजरात बॉम्बस्फोटानंतर मुस्लिमबहुल सराय मीर परिसराला 'दहशतवादी केंद्र' म्हटले जात होते. अबू बशर शेख हा आझमगडमधील या भागातील आहे.

38 जणांना फाशीची शिक्षा

(यूएपीए) आणि आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत न्यायालयाने शुक्रवारी 49 पैकी 38 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. अन्य अकरा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

70 मिनिटांत 21 बॉम्बस्फोट 

26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये संध्याकाळी 6.45 वाजता पहिला बॉम्बस्फोट झाला. मणिनगरमध्ये हा स्फोट झाला. मणिनगर हा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ होता. यानंतर 70 मिनिटं आणखी 20 बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 2002 मधील गोध्रा घटनेचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनने हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते.

दहशतवाद्यांनी टिफिनमध्ये बॉम्ब टाकून तो सायकलवर ठेवला होता. हे स्फोट गर्दीच्या आणि बाजारपेठेत झाले. इंडियन मुजाहिदीन (IM) आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) यांच्याशी संबंधित दहशतवाद्यांचा या स्फोटांमध्ये सहभाग होता. स्फोटांच्या 5 मिनिटांपूर्वी दहशतवाद्यांनी वृत्तसंस्थांना एक मेलही पाठवला होता. ज्यामध्ये 'तुम्हाला जे हवे ते करा, थांबवता येत असेल तर थांबवा."  असं लिहिलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या

Pralhad Joshi NTA : एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget