एक्स्प्लोर
मुंडे, दवे, कुमार: मोदींनी तिसरा सहकारी गमावला
अनंत कुमार यांच्याआधी मोदी सरकारमधील गोपीनाथ मुंडे आणि अनिल माधव दवे या दोन मंत्र्यांचं अकस्मिक निधन झालं होतं.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांच्या रुपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंतच्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात आपल्या मंत्रिमंडळातील तिसरा सदस्य गमावला आहे. 59 वर्षीय अनंत कुमार यांचं आज कर्करोगाने निधन झालं. अनंत कुमार यांच्याआधी मोदी सरकारमधील गोपीनाथ मुंडे आणि अनिल माधव दवे या दोन मंत्र्यांचं अकस्मिक निधन झालं होतं.
अनंत कुमार
कर्नाटकमध्ये भाजपला मजबूत करण्यात अनंत कुमार यांचं योगदान मोलाचं होतं. वाजपेयी सरकारमध्येही ते मंत्री होते. त्यावेळी ते मंत्रिमंडळातील सर्वात तरुण सदस्य होते. अनंत कुमार तब्बल सहा वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. 1996 पासून ते बंगळुरु दक्षिण मतदारसंघातून लोकसभा खासदार होते.
गोपीनाथ मुंडे
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचं 3 जून 2014 रोजी एका अपघातात दिल्लीतच मृत्यू झाला होता. मोदी सरकारमध्ये ते ग्रामविकास मंत्री होते. शपथविधीनंतर महाराष्ट्रात परतण्यासाठी विमानतळावर जात असताना, त्यांच्या कारचा अपघात झाला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला होता. परिणामी, अकाली निधनामुळे भारतीय राजकारणाच्या इतिहासात सर्वात कमी काळ केंद्रीय मंत्रीपद भूषवणारे नेते ठरले.
अनिल माधव दवे
तर मागील वर्षी मे महिन्यात अनिल माधव दवे यांचंही आकस्मिक निधन झालं. ते मोदी सरकारमध्ये पर्यावरण मंत्री होते. पर्यावरणासाठी लढणारा योद्धा अशी दवे यांची ओळख होती. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य नर्मदा नदीच्या सेवेसाठी आणि पर्यावरण वाचवण्यासाठी समर्पित केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
परभणी
जळगाव
राजकारण
Advertisement