एक्स्प्लोर
माझ्यावरील हल्लेखोरांवर अॅट्रॉसिटी दाखल करा: खा. हिना गावित
मी आदिवासी महिला खासदार असल्यानेच जाणीवपूर्वीक मलाच लक्ष केलं, असा आरोप खासदार हिना गावित यांनी केला.
नवी दिल्ली: गाडीवर चढून तोडफोड करणाऱ्या आंदोलकांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप खासदार हिना गावित यांनी लोकसभेत केली.
मी आदिवासी महिला खासदार असल्यानेच जाणीवपूर्वीक मलाच लक्ष केलं, असा आरोप खासदार हिना गावित यांनी केला.
डीपीसीच्या मिटींगला काल इतरही लोकप्रतिनिधी होते. केवळ मला लक्ष्य करण्यात आले. दहा ते पंधरा जणांनी माझ्या गाडीवरती हा हल्ला केला, गाडी पलटवण्याचा प्रयत्न केला. मी गाडीतून उतरले नसते, तर माझा मृत्यूही झाला असता, असं हिना गावित यांनी सभागृहात सांगितलं.
त्याठिकाणी केवळ चार पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित होते, त्यांनी या हल्लेखोरांना रोखण्याचं काम केलं नाही. ते केवळ बघत राहिले, असा आरोपही खासदार गावित यांनी केला.
तोडफोड करणाऱ्या या पंधरा जणांवरती एफआयआर दाखल झाला, पण नंतर त्यांना दोन तासाच्या आत सोडून दिलं. ज्या व्यक्तीने हा हल्ला केला त्याचा हार तुरे घालून सत्कार करण्यात आला, असं काय त्यांना फार मोठं काम केलेला आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मी आदिवासी महिला खासदार आहे, माझं रक्षण पोलीस करु शकत नसतील, तर या राज्यात महिला सुरक्षित आहेत का? या संदर्भात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी खासदार हिना गावित यांनी केली.
नंदुरबारमध्ये कडकडीत बंद
मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनादरम्यान खासदार डॉ. हिना गावित यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ नंदुरबार आणि नवापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. त्यामुळे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
धुळ्यात हल्ला, नंदुरबारमध्ये बंद
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार हिना गावितांवर आंदोलकांनी हल्ला केला होता. यात सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेवेळी त्या प्रचंड घाबरल्या होत्या. आंदोलकांनी खासदार गावित यांच्या गाडीच्या काचाही फोडल्या. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी आदिवासी भागात पसरली.
हिना गावित या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार आहेत. आदिवासी समाजातील मोठे नेते विजयकुमार गावित यांच्या त्या कन्या आहेत.
संबंधित बातम्या
धुळ्यात मराठा आंदोलकांनी खासदार हिना गावितांची गाडी फोडली
खा. हिना गावितांवरील हल्ल्याचा निषेध, नंदुरबारमध्ये कडकडीत बंद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement