एक्स्प्लोर
पाच लाखांपेक्षा जास्त लोक आयकर विभागाच्या रडारवर
नोटाबंदीच्या काळात देशातल्या सर्व नागरिकांनी आपल्याकडच्या जुन्या नोटा जमा केल्या. मात्र यातील 5 लाख 56 हजार लोकांना जुन्या नोटांचा आर्थिक ताळेबंदात गडबड असल्याचं समोर येत आहे. आयकर विभागाच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली : नोटाबंदीच्या काळात देशातल्या सर्व नागरिकांनी आपल्याकडच्या जुन्या नोटा जमा केल्या. मात्र यातील 5 लाख 56 हजार जणांच्या जुन्या नोटांच्या आर्थिक ताळेबंदात गडबड असल्याचं समोर येत आहे. आयकर विभागाच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे.
नोटाबंदीनंतर काळ्या पैशांचा छडा लावण्यासाठी अर्थ मंत्रालयाने 31 जानेवारीपासून 'स्वच्छ धन अभियान' सुरु केलं. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 17 लाख 92 हजार नागरिकांकडून आर्थिक ताळेबंदाची माहिती मागवण्यात आली. यातील 9 लाख 72 हजार नागरिकांनीच आर्थिक ताळेबंद सादर केला. उर्वरित नागरिकांच्या बँक तपशीलाची झडती आयकर विभागाकडून घेण्यात येत आहे.
तर या अभियानाचा दुसरा टप्पा एप्रिल महिन्यापासून सुरु झाला. या टप्प्यानंतर 5 लाख 56 हजार जणांच्या आर्थिक ताळेबंदात गडबड असल्याचं समोर आलं आहे.
विशेष म्हणजे, यातील 1 लाख 4 हजार खातेदार हे 'स्वच्छ धन अभियाना'च्या पहिल्या टप्प्यातील असल्याचं समोर येत आहे. ज्यांना खात्यातील जमा रक्कमेविषयी माहिती देता आली नव्हती. त्यांची ओळख पटवण्यातही आयकर विभागाला यश आलं आहे. त्यांच्यावर आयकर विभाग कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement