एक्स्प्लोर
लॉकडाऊन संपल्यानंतरचं रेल्वेचं नियोजन ठरलं, पाहा कधी सुरु होणार ट्रेन!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. लॉकडाऊननंतर रेल्वे वाहतूक कधी सुरु होणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. हा लॉकडाऊन 14 एप्रिल रोजी संपणार आहे. या काळात सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने लॉकडाऊननंतर रेल्वे वाहतूक कधी सुरु होणार हा सवाल अनेकांना पडला आहे. देशात पंतप्रधानांनी घोषित केलेला लॉकडाऊन 14 एप्रिलला संपल्यानंतर नियोजन करण्यासाठी नुकतीच रेल्वे प्रशासनाची एक व्हिडीओ कॉन्फरन्स पार पडल्याची माहिती आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार या कॉन्फरन्समध्ये सीआरबीने असे संकेत दिले आहेत की सरकार कोरोना प्रकरणांच्या संख्येनुसार लाल, पिवळा आणि हिरवा अशा तीन विभागांमध्ये विभाजन करण्याचा विचार करीत आहे. यामध्ये रेड झोनमध्ये कोणतीही परिवहन सेवा सुरू केली जाणार नाही, पिवळ्या झोन मधल्या भागातल्या सेवा प्रतिबंधित असतील आणि ग्रीन भागांमध्ये सेवांच्या संख्येवर कोणतेही बंधन नाही.
या दरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांत सामाजिक अंतर राखले पाहिजे. 3 टायर स्लीपर आणि एसी 3 टायरमध्ये मधल्या बर्थचे वाटप केले जाणार नाही. कोरोनाची प्रकरणे कमी होईपर्यंत ट्रेनमध्ये किचन किंवा जेवण सेवा दिली जाणार नाही, अशी देखील माहिती आहे. सर्व नियोजित वेळापत्रक रद्द करण्यात येणार असून केवळ विशेष गाड्या चालविल्या जातील, अशी माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 एप्रिलला सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, 'लॉकडाऊन'बाबत निर्णय होण्याची शक्यता
सर्व रेल्वे स्थानकांच्या सर्व प्रवेश गेटवर थर्मल स्क्रीनिंग केली जाईल. तसेच महत्वाचे म्हणजे 60 वर्षांवरील प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी इतक्यात दिली जाणार नाही, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. मास्क परिधान करणे अनिवार्य केले जाणार असून प्रवाशांना मास्क न घातल्यास दंड आकारण्यात येणार आहे. तसंच विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ताब्यात घेतले जाणार आहे.
महत्वाचे म्हणजे कोणत्याही अनारक्षित प्रवासाला परवानगी दिली जाणार नाही. कारण समजा कुणी प्रवासी कोरोनाबाधित आढळल्यास त्या कोचने प्रवास केलेल्या इतर प्रवाशांना शोधून काढणे आवश्यक आहे.
कोरोना बाधितांचा मृत्यूदर महाराष्ट्रात सर्वाधिक; देशपातळीवर चिंतेचा विषय
कोलकाता वगळता बहुतेक मेट्रो शहरे सध्याच्या ट्रेंडनुसार रेड झोनमध्ये येतील. त्यामुळे मुंबई, दिल्ली, सिकंदराबाद येथून जाण्यासाठी कोणतीही ट्रेन सुरू करणे किंवा थांबविणे शक्य होणार नाही. चेन्नई, बंगळूरुमध्ये परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत कोणतीही कोचिंग सेवा न वापरणे चांगले होईल. दरम्यान, 30 एप्रिलला याबाबत पुन्हा आढावा घेतला जाईल, अशी चर्चा या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये झाल्याची माहिती आहे.
कोरोनाबाधित बऱ्याच प्रकरणांमध्ये लक्षणे नसतात. जे काही लक्षणे दाखवत नाहीत आणि म्हणून त्यांची तपासणी करता येत नाही. त्यामुळे धावत्या गाड्या ज्या हॉटस्पॉट्स दरम्यान धावतील त्या ठिकाणांवर थांबवणार नाहीत, असं सुचवण्यात आलं आहे.
सीआरबीनेही सूचना केली होती की, आपणही राज्य सरकारशी संपर्क साधावा आणि रेल्वे चालविण्यासाठी त्यांची सीमेपर्यंत सेवा चालवण्याची परवानगी घ्यावी. काहींनी अशी सूचना केली होती की, आम्ही राज्य हद्दीत मर्यादीत सेवा चालवल्या पाहिजेत, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement