कोरोना बाधितांचा मृत्यूदर महाराष्ट्रात सर्वाधिक; देशपातळीवर चिंतेचा विषय
देशात सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. सोबतचं कोरोनामुळे होणारा मृत्यूदरही देशात सर्वाधिक असल्याने राष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त केली जात आहे.
मुंबई : देशामध्ये कोरोना बाधितांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिक आहे. त्याशिवाय महाराष्ट्राचा मृत्यूदरही देशात सर्वाधिक आहे. ही बाब केंद्रीय पातळीवर अभ्यासाचा आणि चिंतेचा विषय झाली आहे. जागतिक पातळीवरची आकडेवारी पाहता तिथेही महाराष्ट्राचा मत्यूदर अधिक असल्याचं दिसून आलं आहे. देशाच्या तुलनेत तर दुप्पटीहून अधिक मृत्यूदर आहे. गुजरात, हिमाचल प्रदेश या राज्यांचा मत्यूदर देखील महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. देशाच्या मृत्यूचा दर कमी असताना महाराष्ट्र आणि आणखी काही राज्यांचा मृत्यूचा दर अधिक का आहे? याबद्दल केंद्रीय पातळीवर विश्लेषण सुरू आहे.
महाराष्ट्राच्या मृत्यूदराच्या विश्लेषणातून महाराष्ट्रामध्ये कोरोना बाधितवर उपचार करताना ज्या रूग्णांना अधिक धोका आहे, अश्यांचे आजार नियंत्रणीत राखण्यात महाराष्ट्राची आरोग्य यंत्रणा कमी पडतेय की काय असा प्रश्न निर्माण झालाय.
अजित डोवाल यांना भेटल्यावर मर्कजचे मौलाना कुठे पळाले, गृहमंत्री अनिल देशमुखांचा केंद्राला सवाल
मधुमेह, उच्च रक्त दाब आणि इतर आजार नियंत्रात आणण्यात अपयश आल्याने मत्यू वाढले. झालेल्या मत्यूच्या विश्लेषना नंतरचे निरिक्षण.
- जागतिक पातळीवरचा मत्यूदर ५.५८
- देशाचा मत्यूदर २.६६
- महाराष्ट्राचा मत्यूदर ६.२९
महाराष्ट्रातील कोरोना बाधीत वयानुसार लोक आणि मृत्यू
- 1 ते 10 वयोगटाचे 16
- 11 ते 20 वयोगट 52
- 21 ते 30 वयोगट 157
- 31 ते 40 वयोगट 148 मृत्यू 3
- 41 ते 50 वयोगट 146 मृत्यू 5
- 51 ते 60 वयोगट 107 मृत्यू 11
- 61 ते 70 वयोगट 84 मृत्यू 19
- 71 ते 80 वयोगट 28 मृत्यू 8
- 81 ते 90 वयोगट 10 मृत्यू 2
महाराष्ट्राचा देशाता मत्यूदर किती शेजारच्या राज्यांच्या तुलनेत
- महाराष्ट्राचा ६.२९%
- कर्नाटक 2.64 %
- आंध्रप्रदेश 1.12 %
- गोवा 0 %
- छत्तीसगड 0 %
- मध्यप्रदेश 5.45 %
- गुजरात 8.34 %
- उत्तर प्रदेश 0.98 %
- बिहार 3.12 %
- दिल्ली 1.33 %
कोरोना लागण प्रमाण महाराष्ट्र पुरुष 63 % (469) महिला 37 % ( 279 )
कोरोना मृत्यू प्रमाण महाराष्ट्र पुरुष 73% (35) महिला 27% (13)
वडिलांच्या अंत्यविधीसाठी पुण्यातील याचिकाकर्त्याला आसामपर्यंत जाण्याची हायकोर्टाकडून परवानगी महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली राज्यात आज तब्बल एकाच दिवसात 117 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. परिणामी राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 1135 झाला आहे. कोरोनामुक्त झाल्याने 120 जणांना आज घरी सोडण्यात आले. दरम्यान, पुण्यात आज पुण्यात तीन जणांचा मृत्यू झाला. मागील मागील 24 तासात शहरात आठ जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. पुण्यात एकूण मृतांचा आकडा 16 वर गेला आहे. अद्याप राज्यात तिसऱ्या स्टेजचा संसर्ग सुरु झाली नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
Rajesh Tope | महाराष्ट्र अजूनही तिसऱ्या टप्प्यात नाही, सोशल डिस्टन्सिंगचा नियम सर्वांनी पाळावा : राजेश टोपे