एक्स्प्लोर
अभिनेत्री पायल रोहतगी अटकेत; पंतप्रधानांनी लक्ष घालण्याची पतीची विनंती
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि त्यांचे पिता मोतीलाल नेहरु यांच्यावर वादग्रस्त व्हिडीओ बनवून यू ट्यूबवर अपलोड केल्याप्रकरणी पायल रोहतगीला राजस्थानच्या बुंदी पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई : कायमच वादात राहणारी आणि वादग्रस्त व्हिडीओ बनवून वेगवेगळ्या प्रकारची राजकीय टिप्पणी करणारी अभिनेत्री पायल रोहतगी अडचणीत सापडली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि त्यांचे पिता मोतीलाल नेहरु यांच्यावर वादग्रस्त व्हिडीओ बनवून यू ट्यूबवर अपलोड केल्याप्रकरणी पायल रोहतगीला राजस्थानच्या बुंदी पोलिसांनी अटक केली आहे. बुंदी पोलिसांनी पायल रोहतगीला अहमदाबादमधून ताब्यात घेतलं.
देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरु हे मोतीलाल नेहरु यांचे सावत्र पुत्र होते. तसंच पंडित नेहरु यांच्या खऱ्या वडिलांचं नाव मुबारक अली होतं, असा दावा पायल रोहतगीने या व्हिडीओमध्ये केला आहे. शिवाय मोतीलाल नेहरु यांनी पाच लग्न केली होती, असंही तिने म्हटलं आहे. सोबतच व्हिडीओमध्ये पायलने काँग्रेस, जवाहरलाल नेहरु आणि मोतीलाल नेहरु यांच्याबाबत अनेक खळबळजनक दावे केले आहेत.
एबीपी न्यूजने याबाबत पायलचा पती संग्राम सिंहसोबत बातचीत केली. तो म्हणाला की, "पायल रोहतगी तिच्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी अहमदाबादला गेली होती. बुंदीमधील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या तक्रारीवरुन पोलिस अहमदाबाद जाऊन तिला ताब्यात घेतलं. त्यानंतर तिला बुंदीला घेऊन गेले."
"गुगलवर उपलब्ध असलेली माहितीच या वादग्रस्त व्हिडीओमध्ये आहे. पायलविरोधातील प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित आहे," असा दावा संग्राम सिंहने केला आहे.
तर स्वत: पायल रोहतगीने अटकेबाबत ट्वीट केलं आहे. गुगलवरुन माहिती घेऊन मोतीलाल नेहरु यांच्यावर व्हिडीओ केल्याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. फ्रीडम ऑफ स्पीच हा ज्योक आहे.
संग्राम सिंहची पंतप्रधानांना विनंती पायल रोहतगीच्या अटकेनंतर संग्राम सिंहने पंतप्रधान नरेंद्र मोदी याप्रकरणाची दखल देण्याची विनंती केली आहे. संग्राम सिंहने ट्विटरवर गृहमंत्रालय, पंतप्रधान कार्यालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेंशन करुन लिहिलं आहे की, काँग्रेसशासित या राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? सर कृपया याकडे लक्ष द्या.I am arrested by @PoliceRajasthan for making a video on #MotilalNehru which I made from taking information from @google 😡 Freedom of Speech is a joke 🙏 @PMOIndia @HMOIndia
— PAYAL ROHATGI & Team- Bhagwan Ram Bhakts (@Payal_Rohatgi) December 15, 2019
This is freedom of Speech in Congress Ruling state, @HMOIndia @PMOIndia @narendramodi Sir. Please have a look this matter🙏 https://t.co/t9zwiuTu7w
— SANGRAM U SINGH (@Sangram_Sanjeet) December 15, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement