एक्स्प्लोर
तब्बल 55 दहशतवाद्यांच्या मुखात झाकीर नाईकचे नाव!
नवी दिल्ली: आतापर्यंतचा सर्वात जास्त वादातीत इस्लामिक धर्म प्रसारक राहिलेला झाकीर नाईकच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यामुळे झाकीरच्या प्रत्येक हलचालींवर सुरक्षा एजन्सी करडी नजर ठेवून आहेत. सुरक्षा एजन्सीने केलेल्या चौकशीत अनेक धक्कादायक प्रकार उघड होत आहेत.
आता नव्या खुलाशानुसार, एक-दोन नव्हे तर तब्बल 55 दहशतवादी झाकीर नाईकच्या भाषणापासून प्रेरित होऊन, दहशतवादाकडे वळले असल्याचे समोर आले आहे. या 55 जणांनी दहशतवादाकडे वळण्यात झाकीरने मोठी भूमिका निभावलेली आहे.
गृह मंत्रालय झाकीर विरोधात कोणता गुन्हा नोंद होऊ शकतो? याची पडताळणी करत आहे. यासाठी चौकशी करणाऱ्या संस्थेने अधिक खोलात जाऊन तपास केला असता, गेल्या 10 वर्षात अटक झालेल्या दहशतवाद्यांपैकी 55 दहशतवादी झाकीरपासून प्रेरित असल्याचे समोर आले आहे.
ढाकामधील हल्ल्यात मारला गेलेला दहशतवादी रोहन इम्तियाजने आपल्या फेसबुक पेजवर झाकीर नाईकच्या भाषणांपासून प्रेरित होऊन, याकडे वळल्याचे पोस्ट केले. यानंतर झाकीर नाईक प्रकाशझोतात आला होता. पण आता तब्बल 55 दहशतवाद्यांनी झाकीर नाईकच्या भाषणातून प्रेरित झाल्याची कबूली दिल्याने झाकीर नाईकच्या अडचणीत भरच पडली आहे.
झाकीरपासून प्रेरणा घेतलेले हे दहशतवादी विविध दहशतवादी संघटनांसाठी काम करत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये आयसिस, लष्कर, इंडियन मुजाहिदिन, आणि सिमीसारख्या प्रमुख संघटनांचा समावेश आहे. या लीस्टमध्ये आयसिसची हस्तक महिला अफशा जबानी, आयएसशी संबंधित अटकेत असलेला मुदब्बीर शेख, मोहम्मद अब्दुल्ला खान, अबू अनस आणि महम्मद नफीस खान आदींचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त इंडियन मुजाहिदिनचा कतील अहमद सिद्दीकी आणि सिमी समर्थक बीजू सलीमही झाकीरच्या भाषणांनी प्रेरित होते. जमात-उल-मजाहिदिन बांग्लादेशता संचालक असदुल्लाह अली आणि रफीक इस्लाम हेही झाकीरची भाषणे ऐकत होते.
त्यामुळेच 2012 आणि 2013 मधील झाकीरच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास पुन्हा नव्याने करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये झाकीर विरोधात धार्मिक भावनांना चिथवणी देणे, दोन समुदायांमध्ये असंतोष निर्माण करणे आदी गुन्हा दाखल आहेत. त्यामुळे झाकीर विरोधात सबळ पुरावे मिळवण्यासाठी सुरक्षा एजन्सी कार्यरत आहेत.
एकीकडे झाकीरच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना, दुसरीकडे आता दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील रामपूरमधून मुफ्ती अब्दुल समी कासमीला NIA ने अटक केली आहे.
NIA आणि IB ने जवळपास एक डझनहून अधिक अशा धर्मा प्रसारकांची यादी बनवली आहे. ज्यांच्या भडकावू भाषणांमुळे तरुण दहशतवादाकडे वळत आहेत. या लिस्टमधील धर्म प्रसारक आणि संस्थावर NIA आणि IB ने करडी नजर ठेवली आहे. याशिवाय या कथित धर्म प्रसारकांना फडिंग कुठून होत आहे, याच तपासही करण्यात येत आहे.
IS विरोधातील NIA च्या चार्जशीटमध्ये एकूण 14 धर्म प्रसारकांची नावे आहेत. यातील ब्रिटेनमधील अंजेम चौधरी, हमजा अंदरेस, इमरान मन्सूर, अमेरिकेतील हमजा यूसुफ आणि ऑस्ट्रेलियातील शेख फैज मोहम्मद यांच्या नावांचा समावेश आहे.
या सर्वांवर कोणताही आरोप ठेवण्यात आलेला नसला, तरी या साऱ्यांची भाषणे IS शी संबंधित तरुण ऐकत असल्याचे म्हटले आहे.
NIAच्या मतानुसार, हे कथित धर्म प्रसारक कोणतीही भीती न बाळगता, सरळ सरळ दहशतवादाचे समर्थन करून अमेरिकेवर हल्ला चढवत आहेत. तसेच हा देशच इस्लामचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे सांगत आहेत. आणि यांच्या विरोधात लढणाऱ्या कोणत्याही संघटनेला त्यांचे काम योग्यच असल्याचे सर्टिफिकेट देत आहेत.
विशेष म्हणजे, NIAच्या चार्जशीटमध्ये झाकीर नाईकच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र, झाकीरवरून रोज होणाऱ्या नव्या खुलाशांमुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement