एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Exit Poll - कोणत्या राज्यात कोणाची सत्ता? सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी

नवी दिल्ली/मुंबई:  देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशसह 5 राज्यातील निवडणुकांसाठी मतदान पूर्ण झालं आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या सर्व राज्यांचा निकाल 11 मार्चला जाहीर होईल. मात्र एबीपी माझा आणि सीएसडीएसने मतदानोत्तर चाचणी अर्थात एक्झिट पोल घेऊन, चार राज्यातील जनतेची मतं जाणून घेतली आहेत. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजप आघाडी घेण्याची शक्यता आहे. कारण पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असा अंदाज एबीपी न्यूजच्या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. पंजाबमध्ये मात्र भाजप आणि अकालीदलाची जोरदार पिछेहाट होताना दिसते. इथं सत्तेसाठी काँग्रेस आणि आपमध्ये रस्सीखेच बघायला मिळतेय. ABP Exit Poll - कोणत्या राज्यात कोणाची सत्ता? सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी उत्तर प्रदेश - एकूण जागा 403  Narendra-Modi_Akhilesh-Yadav_Mayawati भाजप - 164 ते 176 सपा - 156-169 बसपा - 60 ते 72 इतर - 2 ते 6 पंजाब punjab-assembly एबीपी माझा आणि सीएसडीएस एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये सत्ताधारी अकाली दल आणि भाजपला धक्का बसण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेस यंदा सर्वात मोठा पक्ष होण्याची शक्यता आहे. तर पहिल्यांदाच पंजाबच्या आखाड्यात उतरणाऱ्या आम आदमी पक्षाने मास्टरस्ट्रोक मारला आहे. एबीपी माझा आणि सीएसडीएस एक्झिट पोलनुसार पंजाब (117) अकाली दल/आघाडी - 19 ते 27 काँग्रेस - 45 ते 56 आप - 36 ते 46 कसा झाला सर्व्हे? पंजाबमध्ये एबीपी न्यूज-सीएसडीएसने 9 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान मतदारांचं मत घेतलं. 3268 मतदारांशी बातचीत केलं. हा सर्व्हे युरोपियन सोसायटी फॉर ओपिनियन अँड मार्केटिंग रिसर्च म्हणजेच ESOMAR च्या नियमांचं पालन करुनच केला आहे. उत्तराखंड BJPउत्तराखंडमध्ये भाजपचं कमळ फुलण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि मुख्यमंत्री हरिश रावत यांना धक्का बसण्याचा अंदाज एबीपी माझा आणि सीएसडीएस एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. उत्तराखंड (71) भाजप - 34 ते 42 काँग्रेस - 23 ते 29 अन्य - 3 ते 9 कसा झाला सर्व्हे? उत्तराखंडमध्ये एबीपी न्यूज-सीएसडीएसने 17 फेब्रुवारीपासून 24 फेब्रुवारीपर्यंत मतदारांचं मत जाणून घेतलं. 20 विधानसभा मतदारसंघातील 1859 मतदारांशी संवाद साधला. युरोपियन सोसायटी फॉर ओपिनियन अँड मार्केटिंग रिसर्च म्हणजेच ESOMAR च्या नियमांचं पालन करुनच हा सर्व्हे केला आहे.

गोवा

गोव्यात यंदा भाजपला सत्तेसाठी मोठी झटापट करावी लागत आहे. एबीपी माझा आणि सीएसडीएस एक्झिट पोलच्या अंदाजानुसार - गोवा - एकूण जागा 40 काँग्रेस - 10 ते 16 भाजप - 16-22 आप - 0 ते 4 MGP - 1 ते 5 कसा झाला सर्व्हे? गोव्यात एबीपी न्यूज-सीएसडीएसने 10 फेब्रुवारीपासून 22 फेब्रुवारीदरम्यान मतदारांचं मत जाणून घेतलं. यादरम्यान 1748 मतदारांशी मतं नोंदवण्यात आली. हा सर्व्हे युरोपियन सोसायटी फॉर ओपिनियन अँड मार्केटिंग रिसर्च म्हणजेच ESOMAR च्या नियमांचं पालन करुनच केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Chaturvedi On Eknath Shinde : तंत्र-मंत्र आणि अमावस्येची रात्र, एकनाथ शिंदेंबाबत प्रियंका चतुर्वेदी काय म्हणाल्या?Vaibhav Naik Emotional Speech : हुंकारले, गहिवरले पण बरसले...रडू येताच नाईकांनी भाषण थांबवलंABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 02 December 2024Ajit Pawar Delhi Visit : अजित पवार दिल्लीसाठी रवाना; सत्तास्थापनेच्या हालचालींना वेढ, अमित शाहांची भेट घेणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
Embed widget