एक्स्प्लोर

तलवार दाम्पत्याकडून तुरुंगातील 1417 दिवसांची कमाई दान!

कैदी नंबर 9342 (राजेश तलवार) आणि 9343 (नुपूर तलवार) आज तुरुंगातून सुटणार आहेत. गाझियाबादच्या सीबीआय कोर्टात त्यांच्या सुटकेची प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु दोघांची सुटका आजही टळू शकते, असे कयास लावले जात आहेत.

गाझियाबाद : आरुषी-हेमराज हत्याप्रकरणात चार वर्षांची शिक्षा भोगलेल्या राजेश आणि नुपूर तलवार यांनी, जेलमध्ये कमावलेले पैसे दान केले आहेत. तलवार दाम्पत्य सुमारे 1417 दिवस तुरुंगात राहिले. या दिवसात त्यांनी कैद्यांना वैद्यकीय सेवा दिल्या. यातून कमावलेली रक्कम घेण्यास दाम्पत्याने इन्कार केला. तलवार दाम्पत्याची सुटका आजही टळणार? कैदी नंबर 9342 (राजेश तलवार) आणि 9343 (नुपूर तलवार) आज तुरुंगातून सुटणार आहेत. गाझियाबादच्या सीबीआय कोर्टात त्यांच्या सुटकेची प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु दोघांची सुटका आजही टळू शकते, असे कयास लावले जात आहेत. सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश सट्टीवर असल्याने दुसऱ्या कोर्टात कागपत्र जमा केले आहेत. मेरठमध्ये वकिलांवरील लाठीचार्जच्या विरोधात गाझियाबादचे वकील संपावर आहेत. संपामुळे कोर्टाचं कोणतंही काम होणार नाही, असं गाझियाबाद बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी सांगितलं. जेलमध्ये कमावलेले पैसे दान तलवार दाम्पत्याने जेलमध्ये 1417 दिवसांत कमावलेले 99 हजार रुपये त्यांनी कैद्यांच्या कल्याणासाठी जेल प्रशासनाला दान केले आहेत. जेलमध्ये असताना राजेश तलवार यांनी मुरादनगरच्या आयटीएस हॉस्पिटलच्या सहकार्याने तयार केलेल्या डेंटल क्लिनिकमध्ये पूर्णवेळ दिला. यादरम्यान त्यांनी जेल अधिकारी आणि कैद्यांच्या दातांवर इलाज केला. तर नुपूर तलवार यांनी त्यांचा वेळ मुलं आणि अशिक्षित महिलांना साक्षर करण्यात घालवला. या दोघांनी मिळून प्रत्येकी 49 हजार 500 रुपये कमावले. अखेरच्या दिवशी कैद्यांची गर्दी हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर तलवार दाम्पत्य रविवारचा संपूर्ण दिवस सहकारी कैद्यांना भेटलं आणि बॅरेकमध्ये आपलं सामन बांधलं. तर रविवारी जेलच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या अखेरच्या दिवशी दात चेक करणाऱ्या कैद्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी त्यांनी आठ जणांना तपासलं. तलवार दाम्पत्याची दर 15 दिवसांनी जेलवारी प्रशासनाने तलवार दाम्पत्याला दर 15 दिवसांनी कारागृहातील कैद्यांना तपासायला येण्याची विनंती केली होती. तलावार दापत्याने त्यांची ही विनंती मान्य केली आहे, असं कारागृहाचे डॉक्टर सुनिल त्यागी यांनी संगितलं. त्यामुळे तलावार दाम्पत्याला दर 15 दिवसांनंतर कारागृहात यावं लागणार आहे. काय आहे नेमकं प्रकरण? 2008 साली आरुषी हत्याकांडाने संपूर्ण देश हादरुन गेला होता. 16 मे 2008 या दिवशी नोएडातील जलवायू विहार परिसरातून 14 वर्षीय आरुषीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला होता. त्याच्याच पुढच्या दिवशी छतावरुन तलावर कुटुंबीयातील नोकर हेमराज याचाही मृतदेह सापडला होता. या दुहेरी हत्येप्रकरणी पोलिसांनी 23 मे 2008 रोजी आरुषीचे वडील राजेश तलवार यांना अटक केली होती. 29 मे 2008 साली तत्कालीन मुख्यमंत्री मायावती यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं. त्यानंतर सीबीआयने चौकशी करुन तलवार दाम्पत्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या खटल्यातील सर्व सुनावणीनंतर कोर्टाने 26 नोव्हेंबर 2013 साली नुपूर आणि राजेश तलवार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या शिक्षेविरुद्ध तलवार दाम्पत्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. 12 ऑक्टोबर 2017 रोजी अलाहाबाद हायकोर्टाने तलवार दाम्पत्याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरुषी हत्याकांडाचा घटनाक्रम 1. चौदाव्या वाढदिवसाच्या एकदिवस आधी म्हणजे 16 मे 2008 रोजी आरुषी नोएडामधील तिच्या घरातील बेडरुममध्ये मृतावस्थेत आढळली. याशिवायत्यांचा नोकर हेमराज बेपत्ता असल्याने त्याला संशयित घोषित करण्यात आलं. पण त्यानंतर इमारतीच्या गच्चीवर हेमराजचा मृतदेह आढळला. 2. आरुषीच्याहत्येनंतर सातव्या दिवशीम्हणजेच 23 मे रोजी तिचे वडील राजेश तलवार यांना दुहेरी हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यानंतर दोन महिन्यांनी त्यांची जामीनावर सुटका झाली. 3. हे प्रकरण 31 मेरोजी नोएडा पोलिसांकडूनसीबीआयकडे सोपवण्यात आलं. आरुषीला नोकर हेमराजसोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यामुळे राजेश तलवार यांनी आपल्या मुलीची हत्या केली, असं पोलिसांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. 4. अल्पवयीन मुलांबाबत पोलिसांनीसार्वजनिक केलेले आरोप अजिबात स्वीकारले जाणार नाहीत, असं नॅशनल कमिशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ चिड्रेनराईट्स अर्थात एनसीपीसीआरने म्हटलं होतं. 5. जूनमहिन्यात हेमराजचे तीनमित्र जे तलवार कुटुंबात काम करत होते त्यांना अटक करण्यात आली. आरुषी आणि हेमराज यांची हत्येतील संशयित म्हणून सीबीआयने या तिघांचीही चौकशी केली. 6. त्यांच्याविरोधात कोणतेहीपुरावे न सापडल्याने सीबीआयने तीन महिन्यांनंतर त्यांची मुक्तता केली. 7. कोर्टात हजर न राहण्याच्याआदेशांकडे दुर्लक्ष केल्याने एप्रिल 2012मध्ये नुपूर तलावर यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पाच महिन्यांनी म्हणजेच सप्टेंबरमध्ये त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. 8. डिसेंबर 2012मध्ये सीबीआयने हेप्रकरण बंद करण्याची परवानगी मागितली. राजेश तलवार मुख्य संशयित असले तरी त्यांच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याचं सीबीआयने कोर्टात सांगितलं. 9. हेमराज आणि आरुषीचा गळाअशाप्रकारे घोटण्यात आला आहे की, वैद्यकीय तज्ज्ञच असं करु शकतात. याशिवाय राजेश तलवार यांचा गोल्फ क्लब घरातच आढळून आला, त्याचा उपयोग दोघांना मारण्यासाठी केला असावा, असं सीबीआयने कोर्टात सांगितलं होतं. 10. 12 ऑक्टोबर 2017 रोजी तलवार दाम्पत्याची प्रकरणातून निर्दोष मुक्तता

संबंधित बातम्या :

तलवार दाम्पत्याची आज सुटका, मात्र दर 15 दिवसांनी जेलवारी

अलाहाबाद हायकोर्टाच्या निर्णयानंतर तलवार दाम्पत्य भावूक

आरुषी हत्याकांड : निकालाआधीच्या रात्री नेमकं काय घडलं?

आरुषी हत्याकांडातून तलवार दाम्पत्याची निर्दोष मुक्तता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
Embed widget