एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आधार कार्ड पॅन कार्डसोबत आजच लिंक करा!
सरकारने आधार कार्डला पॅन क्रमांक जोडणं बंधनकारक केले आहे. त्यामुळे अजूनही तुम्ही जर आधार कार्ड पॅनसोबत लिंक केलं नसेल तर तातडीने करा. कारण आज शेवटचा दिवस आहे.
मुंबई/नवी दिल्ली : आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची आज शेवटची तारीख आहे. बँक ऑफ डायरेक्ट टॅक्सने पॅनकार्ड आधार कार्डला जोडण्याची मुदत आज संपणार आहे. आतापर्यंत चार वेळा ही मुदत वाढ करुन देण्यात आली होती. सरकारने आधार कार्डला पॅन क्रमांक जोडणं बंधनकारक केले आहे. त्यामुळे अजूनही तुम्ही जर आधार कार्ड पॅनसोबत लिंक केलं नसेल तर तातडीने करा. कारण आज शेवटचा दिवस आहे.
आधार कार्ड पॅनसोबत कसं लिंक कराल?
आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेलं नाव टाकावं लागेल.
वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होईल.
दरम्यान आधार कार्ड आणि पॅनवर असणारी जन्म तारीख एक असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.
संबंधित बातम्या :
मोबाईल आणि आधार लिंक करताना या दहा गोष्टी लक्षात ठेवा
आधार कार्ड लिंकसाठी मेसेज पाठवून ग्राहकांना घाबरवू नका : सुप्रीम कोर्ट
बँक खात्याशी आधार लिंक न केल्यास काय होईल?
PPF आणि पोस्ट ऑफिस खात्यांना आधार लिंक करणं अनिवार्य
तुमचं बँक खातं आणि आधार लिंक आहे का? असं चेक करा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement