एक्स्प्लोर
84 व्या वर्धापनदिनी हवाईदलाच्या चित्तथरारक कसरती
गाझियाबाद : 84 व्या वर्धानपदिनानिमित्त आज भारतीय हवाईदलाने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. गाझियाबाद इथल्या हिंडन एअरबेसवर भारतीय हवाईदलाच्या वैमानिकांनी थरारक कसरती करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
हवाईदलाच्या भात्यातील हुकमी हत्यार असलेलं तेजस, सुखोई या लढाऊ विमानांचीही प्रात्यक्षिकं यावेळी दाखवली. त्याचसोबत वाहतूक विमानं, हेलिकॉप्टर यांनीही अनेक थरारक कसरती सादर केल्या.
या प्रात्यक्षिकांआधी जवानांनी पथसंचलन केलं. यावेळी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही हजेरी लावली.
दरम्यान,राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना हवाईदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर हवाईदलाचे प्रमुख अनुप राहा यांनी उरी,पठाणकोट हल्ल्याचा उल्लेख कर, परिस्थिती कशी आहे, हे हल्ल्यांमुळे समजू शकतो, हवाईदल कुठल्याही परिस्थितीत तयार आहेत."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
सोलापूर
पुणे
राजकारण
Advertisement