एक्स्प्लोर
प्रजासत्ताक दिनी आसाम आणि मणिपूरमध्ये सात स्फोट

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहाला आसाम आणि मणिपुरमध्ये गालबोट लागलं आहे. आसाम आणि मणिपुरमध्ये एकूण सात ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. पण यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्फा या दहशतवादी संघटनेने आसाममधील चराईडो, शिबसागर, डिब्रुगड आणि तिनसुकिया आदी जिल्ह्यात बॉम्बस्फोट घडवून आणले. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. तर दुसरीकडे आंध्रप्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी विशाखापट्टणममध्ये आंदोलन सुरु आहे. यामध्ये 100 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये तेलगू अभिनेता संपूर्णेश बाबूचाही सहभाग आहे.
आणखी वाचा























