(Source: ECI/ABP News/ABP Majha)
5G spectrum auction : 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावातून केंद्राला मिळाला तब्बल दीड लाख कोटींचा महसूल
5G spectrum auction : 40 व्या फेरीनंतर 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव संपला असून या लिलावातून केंद्र सरकारला तब्बल दीड लाख कोटी रूपयांचा महसूल मिळाला आहे.
5G spectrum auction : गेल्या सात दिवसांपासून सूरू असलेला 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव आज संपला. 5 जी स्पेक्ट्रमच्या लिलावातून केंद्र सरकारला तब्बल दीड लाख कोटी रूपयांचा महसूल मिळला आहे. 40 व्या फेरीनंतर 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव संपला. एअरटेल आणि जिओ या दूरसंचार कंपन्या आता संपूर्ण देशभर 5 जीचे जाळे पसरवणार आहेत. सात दिवस हा लिलाव चालला होता. सप्टेंबर 2022 अखेर 5 जीची सुविधा मिळण्याची शक्यता आहे.
भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ संपूर्ण देशात 5जीचं जाळं पसरवणार असून व्होडाफोन-आयडियाकडून काही मोजक्या सर्कलमध्ये लिलावास पसंती देण्यात आली. अदानी डाटाकडून 26 MHz स्पेक्ट्रममध्ये अधिक रुची घेत नेटवर्कचे जाळे पसरवणार आहेत. दूरसंचार मंत्र्यांनी ऑक्टोबरपर्यंत 5जी सेवा येणार असल्याची माहिती दिली आहे. परंतु, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करत सप्टेंबरमध्ये 5जी सेवा उपलब्ध होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काही सेकंदात संपूर्ण चित्रपट डाउनलोड होणार
5G स्पेक्ट्रमचा हा लिलाव सात दिवस चालला होता. 5G नेटवर्कचा वेग 4G नेटवर्कपेक्षा 10 पट जास्त असेल. 5G नेटवर्कद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलवर काही सेकंदात संपूर्ण चित्रपट डाउनलोड करू शकाल.
सर्वात मोठी बोली
26 जुलै रोजी 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू झाला होता. देशात 5G स्पेक्ट्रम लिलावाच्या पहिल्या दिवशी 1.45 लाख कोटी रुपयांच्या बोली मिळाल्या. उद्योगपती मुकेश अंबानी, सुनील भारती मित्तल आणि गौतम अदानी यांच्या कंपन्यांनी रेडिीओ वेव्हसाठी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लिलावासाठी बोली लावली.
केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले होते की, 5G लिलाव हे स्पष्टपणे दर्शविते की उद्योगांकडून विस्तारू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून विकासाच्या टप्प्यात आता प्रवेश केला आहे. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया संपवत ऑक्टोबरमध्ये भारतात 5G सेवा सुरु करण्याचा प्रयत्न असेल. भारतातील 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. यामुळे भारतात लवकरच ऐतिहासिक घटना घडणार आहे.