एक्स्प्लोर
लष्कराचं मोठं यश, उरी सेक्टरमध्ये 5 दहशतवाद्यांचा खात्मा

फाईल फोटो
जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या जवानांनी तब्बल पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. उरी सेक्टरमध्ये भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असतानाच पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. उरीमध्ये आज सकाळपासूनच लष्कराचं सर्च ऑपरेशन सुरु होतं.
मागील 72 तासांपासून घुसखोरी करणाऱ्या 12 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. अजूनही सुरक्षा दलाचं ऑपरेशन सुरूच आहे. मागील अनेक दिवसांपासून दशहतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठीच लष्करानं सध्या सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे.
बुधवारी देखील सुरक्षा दलांनी दहशतवाद्याचा बिमोड करुन त्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. लष्करानं काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माछिलमध्ये चार दहशतवाद्यांना ठार केलं होतं.
संबंधित बातम्या:
माछिल सेक्टरमध्ये पाककडून घुसखोरीचा प्रयत्न, 4 दहशतवाद्यांना कंठस्नान
आणखी वाचा
Advertisement
Advertisement
























