एक्स्प्लोर
गोव्यात तीन वेगवेगळ्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 6 जण जखमी

पणजी: गोव्यात गेल्या 24 तासात नेवरा, खांडेपार आणि खोर्ली- ओल्ड गोवा येथे झालेल्या 3 अपघातांमध्ये 8 ठार तर 6 जण गंभीर जखमी झाले. काल रात्री नेवरा येथे उशीरा दोन दुचाकी अपघातात गौरीश बोडनेकर आणि बाळा सावंत या दोन युवकांचा मृत्यू झाला.
सायंकाळी ओल्ड गोवा जवळील खोर्ली येथे कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मध्ये 5 ठार तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 3 मुंबईचे तर दोघे गोव्याचे आहेत. तर पाचही जखमी मंबईचे आहेत.
मृतांची नावे पुढील प्रमाणे:
इदा क्वीरोझ आणि लुइस मिनेझिस (गोवा)
नाताली परेरा, वृशाली भोईर आणि 4 वर्षांची मनश्री भोईर (मुंबईतील रहिवासी)
गंभीर जखमींमध्ये शानल परेरा, शेनॉन परेरा, रूपा परेरा, साविया परेरा आणि सौरभ भोईर हे सर्व मुंबईचे आहेत. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन फरार झाला. अपघातामध्ये कारचालकाने दोन पादचाऱ्यांना चिरडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हे दोघे स्थानिक होते.
खांडेपार-फोंडा येथे आज दोन दुचाकींचा दुसरा अपघात झाला. यात योगेश हा 34 वर्षाचा तरुण जागीच ठार झाला. अपघातग्रस्त दुचाकी चालक अपघातानंतर दुचाकी घटनास्थळावर टाकून पळाला.
अपघातांमध्ये बळी जाणाऱ्यांची संख्या वाढत असल्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी उद्या सकाळी वाहतूक खात्याचे अधिकारी आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
अहमदनगर
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
