7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरचं मिळणार खुशखबर! महागाई भत्त्यात वाढ होणार?
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (Dearness Allowance) आता वाढ करण्यात येणार आहे. महागाई भत्त्यामध्ये 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकार लवकरच घेण्याची शक्यता आहे.
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर देणारी बातमी समोर आली आहे. कारण सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये (Dearness Allowance) आता वाढ करण्यात येणार आहे. महागाई भत्त्यामध्ये 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकार लवकरच घेण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश सरकारने महागाई भत्त्यामध्ये 3 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी आता 31 टक्के महागाई भत्ता मिळणार असल्याची घोषणा केली आहे.
केंद्र सरकारच्या कर्मचार्यांबद्दल बोलायचे झाले तर अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकानुसार (AICPI) या कर्मचाऱ्यांना सप्टेंबर 2021 पर्यंत 33 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात सुमारे 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. सीपीआयचा म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक जर 125 पर्यंत राहिला तर महागाई भत्ता आणखी 3 टक्क्यांनी वाढू शकतो. केंद्र सरकारने महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला तर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. त्याचे पेमेंट जानेवारी 2022 पासून केले जाईल. महागाई भत्ता 3 टक्के वाढला तर पगारात 20000 रुपयांची वाढ होऊ शकते.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना 6 हजार कोटी रुपयांचा लाभ होणार आहे. महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ केल्यामुळे हिमाचल प्रदेशमधील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. यासाठी सरकारच्या तिजोरीतून 500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याआधी सरकारी कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्ता दिला जात होता. याशिवाय कल्याणकारी योजना आणि पेन्शनचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादाही 35000 रुपयांवरून 50000 रुपये करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: