Malegaon: मालेगावात काँग्रेसला मोठा धक्का! पक्षातील सर्व 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Malegaon Municipal Corporation: मालेगावमधील काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी आमदार रशीद शेख आणि महापौर ताहिरा शेख यांनीही पक्षाला सोठचिठ्ठी दिलीय.
Malegaon Municipal Corporation: मालेगाव महानगरपालिकेतील काँग्रेसच्या (Congress) सर्व 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केलाय. मालेगावमधील काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी आमदार रशीद शेख आणि महापौर ताहिरा शेख यांनीही पक्षाला सोठचिठ्ठी दिलीय. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मालेगावात मोठा हादरा बसला आहे. मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या कार्यक्रमात रशीद शेख, ताहिरा शेख यांच्यासह 28 नगरसेवक यांनी पक्षांतर केलं. यावेळी अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
एएनआयचं ट्वीट-
अजित पवार काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील सर्वांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. "शेख रशीद शेख शफी 1999 साली विधानसभेत आमदार म्हणून आले होते. मालेगावमधील प्रत्येक घटकाला मदत करण्यासाठी त्यांचा पुढाकार असायचा. मालेगावचे प्रश्न तळमळीने मांडताना आम्ही त्यांना पाहिले आहे. शेख रशीद यांची समाजाशी बांधिलकी असल्यामुळं त्यांच्यासोबत मनपातील सर्व नगरसेवक राष्ट्रवादीत येत आहेत.आदरणीय पवारसाहेबांनी देखील कधीही जातीपातीचा विचार न करता सर्वांना सोबत घेऊन पक्ष चालवला.अल्पसंख्याक समाजामध्ये शिक्षण कमी आहे. त्यामुळं या समाजाला शिक्षणात प्रगती करण्यासाठी मालेगाव येते काय सुविधा उभारता येतील. तसेच मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळाच्या माध्यमातून काय योजना आखता येतील, याचा विचार आम्ही नक्कीच करु. तसेच हे आर्थिक वर्ष संपण्याच्या आधी पुन्हा एकदा चांगला निधी मालेगावला देऊ", असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या नेत्यांची नावे-
आमदार रशीद शेख, ताहेरा शेख रशीद यांच्यासह नगरसेवक माजी मनपा सभागृह नेता अन्सारी मोहम्मद अस्लम खलील अहमद, माजी स्थायी समिती सभापती जफर अहमद अहमदुल्लाह, विठ्ठल भिका बर्वे, सलीम अन्वर, नजिर अहमद इरशाद अहमद, मोहम्मद कमरुन्नीसा रिजवान, नंदकुमार वाल्मिकी सावंत, मंगलाबाई धर्मा भामरे, फकीर मोहम्मद शेख सादीक, जैबून्नीसा नुरुल्ला, शबाना शेख सलीम, हमीदाबी शेख जब्बार, रजिया बेगम अब्दुल मजीद, अब्दुल अजीज अब्दुल सत्तार, शेख रजियाबी इस्माईल, निहाल अहमद मोहम्मद सुलेमान, फारुख खान फैजूला खान, नुरजहॉ मोहम्मद मुस्तफा, सलीमा बी सैय्यद सलीम, किशवरी अशरफ कुरेशी, नईम पटेल शेख इब्राहिम पटेल, मोहम्मद सुलतान मोहम्मद हारुण, हमीदाबी साहेबअली, रिहानाबानो ताजुद्दीन, फैमीदा मोहम्मद फारुख कुरेशी, अनिस अहमद मो. अयुब शाह फकीर आदी 28 नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती इरफान अली आबीद अली, माजी नगरसेवक मोहम्मद इस्माईल (मुल्ला), माजी नगरसेवक शेख गौस शेख मुनीर, एमआयएम चे नगरसेवक अब्दुल अजीज शेख रफीक (बेकरीवाला), भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय (भारत) संजय आहीरे, मुशरीफ खान रंगारी, शेख इमरान इत्यादींनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय.
याआधी माजी आमदार असिफ शेख यांनी काँग्रेस सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता त्यांचे वडील आमदार रशीद शेख आणि आई महापौर ताहिरा शेख आणि काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. रशीद शेख हे काँग्रेसचे निष्ठावंत मानले जात होते. एवढच नव्हे तर, रशीद शेख हे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, या कुटुंबाला आपल्याकडं खेचण्यात राष्ट्रवादीला यश आलंय.
मालेगाव महापालिकेत एकूण 84 जागा आहेत. 2017 मध्ये मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक 30 नगरसेवक निवडून आले होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं 20 जागेवर विजय मिळवला. तर, शिवसेना 12, एमआयएम 7 आणि जनता दल सेक्युरलला 7 जागा जिंकल्या होत्या.
हे देखील वाचा-
- Nitesh Rane: नितेश राणेंना सुप्रीम कोर्टातही धक्का; मिलिंद नार्वेकरांचा खोचक टोला, म्हणाले...
- नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 10 दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्याचे निर्देश
- ही तर संधीसाधू सेना..कॉंग्रेसने जन्माला घातली, भाजपचा शिवसेनेला टोला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha