एक्स्प्लोर
भर रस्त्यात तरुणीची हत्या, चाकूनं 30हून अधिक वार
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील बुराडी भागात भर रस्त्यात एका मुलीवर चाकूनं वार केल्याची धक्कादायक घटन घडली आहे. तिच्यावर हल्ला करण्यात आला तेव्हा कुणीही तिच्या बचावासाठी पुढे सरसावलं नाही. तिचा जीव जाईपर्यंत आरोपी तिच्यावर वार करीत होता.
मृत मुलगी 22 वर्षाची होती. तर आरोपी सुरेंद्र हा 32 वर्षाचा आहे. करुणा नावाच्या मुलीवर सुरेंद्रनं चाकूनं तब्बल 30हून अधिक वार केले होते. आज सकाळी ही घटना घडली. आरोपी तरुणीच्या ओळखीचा असल्याची माहिती समजते आहे.
जखमी तरुणीला आयएसबीटी ट्रामा सेंटरमध्ये नेण्यात आलं. पण तिथे तिला मृत घोषित केलं गेलं. भररस्त्यात तरुणीवर वार करणाऱ्या या आरोपीला नागरिकांनी पकडून बराच चोप दिला. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement