वर्षभरात दोन लाख भारतीयांचा देशाला अखेरचा 'रामराम'! 2020 तुलनेत देश सोडणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली
206378 Indians renounced their citizenship: सरकारने गेल्या 5 वर्षांचा डेटा देखील सादर केला. या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या 2020 च्या तुलनेत सुमारे अडीच पट आहे.

206378 Indians renounced their citizenship in 2024: परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले की, 2024 मध्ये 2,06,378 भारतीयांनी आपले नागरिकत्व सोडून इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारलं आहे. कीर्ती सिंह म्हणाले की, नागरिकत्व सोडण्याची कारणे वैयक्तिक आहेत आणि ज्या व्यक्तीने हा निर्णय घेतला आहे त्यांनाच हे माहित आहे. त्यांनी सांगितले की, सरकार अनिवासी भारतीयांशी संबंध वाढवण्यावर, त्यांच्या ज्ञानाचा आणि नेटवर्कचा फायदा घेण्यावर भर देत आहे. यशस्वी आणि प्रभावशाली अनिवासी भारतीय देशाची सॉफ्ट पॉवर मजबूत करतात असा सरकारचा विश्वास आहे. सरकारने गेल्या 5 वर्षांचा डेटा देखील सादर केला. या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या 2020 च्या तुलनेत सुमारे अडीच पट आहे.
2020 च्या तुलनेत 2024 मध्ये अडीच पट जास्त लोकांनी नागरिकत्व सोडले
काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री कीर्ती यांनी गेल्या पाच वर्षांचा डेटा देखील दिला. सरकारच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये 85,256 लोकांनी, 2021 मध्ये 1,63,370, 2022 मध्ये 2,25, 620 आणि 2023 मध्ये 2,16,219 लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले. यापूर्वी, 2011 मध्ये ही संख्या 1,22,819, 2012 मध्ये 1,20,923, 2013 मध्ये 1,31,405 आणि 2014 मध्ये 1,29,328 होती.
2020 नंतर नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे
2020 पासून नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे. राज्यसभेत सादर केलेल्या आकडेवारीत असे सांगण्यात आले की 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये थोडीशी घट झाली आहे. त्याच वेळी, गेल्या तीन वर्षांत हा आकडा दोन लाखांपेक्षा जास्त राहिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























