एक्स्प्लोर

लक्षात ठेवा देशाशी गद्दारी करत आहात, काळ बदलेल, शिक्षा नक्की मिळेल; 'मतचोरी' हा केवळ निवडणूक घोटाळा नाही, तर तो संविधान आणि लोकशाहीविरुद्ध मोठा घोटाळा, राहुल गांधींचा गर्भित इशारा

Rahul Gandhi on Election Commission: राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक निकालानंतरच आम्हाला मतचोरीचा संशय आल्याचे म्हटले आहे.

Rahul Gandhi on Election Commission: लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी तब्बल एक तास 11 मिनिटे प्रेझेंटेशन करत केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. दोघांनी संगनमत करून मतचोरी करत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी आपल्या प्रेझेंटेशनमधून केला. तुम्ही देशाशी गद्दारी करत आहात, काळ बदलेल तेव्हा तुम्हाला केलेल्या कृत्याची शिक्षा  नक्की मिळेल, असा गर्भित इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. दरम्यान, काल (8 ऑगस्ट) दिलेल्या प्रेझेंटेशननंतर आजही राहुल गांधी यांनी आठ मिनिटांचा व्हिडिओ रिलीज करत पुन्हा एकदा भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. इतकेच नव्हे तर राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक निकालानंतरच आम्हाला मतचोरीचा संशय आल्याचे म्हटले आहे. त्यानंतरच आम्ही याबाबतीत काम सुरू केलं आणि मतचोरी समोर आणल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

राहुल गांधी यांनी अशा देशभरात 100 ठिकाणी मतचोरी झाल्याचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला 15 जागा कमी मिळाल्या असत्या, तरी मोदी पंतप्रधान झाले नसते आणि इंडिय आघाडीचे सरकार स्थापन झाले असते, असा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे. मशीन रीडेबल मतदारयादी आयोग देत नसल्याने संशय बळावल्याचे ते म्हणाले. 

महाराष्ट्राची निवडणूक चोरली

राहुल यांनी कर्नाटकची मतदार यादी स्क्रीनवर दाखवली आणि मतदार यादीत संशयास्पद मतदार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की महाराष्ट्राचे निकाल पाहिल्यानंतर आमच्या शंका निश्चित झाल्या की निवडणूक चोरी झाली आहे. मशीन रीडेबल मतदार यादी न दिल्याने आम्हाला खात्री पटली की निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करून महाराष्ट्राची निवडणूक चोरली आहे. राहुल म्हणाले की आम्ही येथे मतदान चोरीचे मॉडेल सादर केले, मला वाटते की हे मॉडेल देशातील अनेक लोकसभा आणि विधानसभेत वापरले गेले. कर्नाटक निवडणूक आयोगाने राहुलच्या आरोपांवर प्रतिज्ञापत्र मागितले आहे. त्यांनी लेखी तक्रार करावी जेणेकरून पुढील कारवाई करता येईल असे म्हटले आहे.

महाराष्ट्रात 40 लाख बनावट मतदार कुठून आले?

राहुल म्हणाले की, महाराष्ट्राच्या मतदार यादीतील 40 लाख बनावट नावे रहस्यमय मतदार कुठून आले: महाराष्ट्रात काही महिन्यांत लाखो मतदारांची नावे यादीत जोडण्यात आली, जी खूपच चिंताजनक आहे. 40 लाख मतदार गूढ आहेत. पाच महिन्यांत येथे अनेक मतदार जोडले गेले. निवडणूक आयोगाने मतदार यादीबद्दल उत्तर द्यावे. मतदार यादी बरोबर आहे की चूक हे त्यांनी सांगावे.

संध्याकाळी पाचनंतर मतदान कसे वाढले?

सायंकाळी पाचनंतर मतदानात वाढ होणे हे देखील आश्चर्यकारक आहे. संध्याकाळी पाचनंतर मतदान का वाढले? निवडणूक आयोगाने याचे उत्तर द्यावे. काँग्रेस पक्षाने मतांच्या हेराफेरीबाबत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले आहेत, परंतु आयोगाने एकही उत्तर दिले नाही. मतांची चोरी पकडण्यासाठी आम्हाला सहा महिने लागले.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pulwama Case NIA: पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
India Belgium Defence Deal: ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
Turkey India Relations : ज्या देशाने पाकिस्तानला साथ दिली, 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात ड्रोन पुरवले, त्या देशाचा भारतासाठी नवा प्लॅन तयार
ज्या देशाने पाकिस्तानला साथ दिली, 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात ड्रोन पुरवले, त्या देशाचा भारतासाठी नवा प्लॅन तयार
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार
Permanently Shifted! SIR मधून चक्क भाजप खासदार राघव चड्ढांचं नाव वगळलं; पंजाब सरकारवर गंभीर आरोप करत म्हणाले, 'जेव्हापासून मी आप सोडला तेव्हापासून..' आपचा सुद्धा पलटवार

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण समोर
Pulwama Case NIA: पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
Vidyanand Bapat: मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv News: महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
India Belgium Defence Deal: ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
 Chhatrapati Sambhajinagar Fire News : मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न, 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
Vidyanand Bapat : विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? रत्नागिरीतून आई वडिलांचा विद्यानंद बापट यांना भावनिक फोन
विद्यानंद बरा आहेस ना, तुझी तब्येत कशी आहे, जास्त लागलं नाही ना? आई वडिलांचा भावनिक फोन
Embed widget