एक्स्प्लोर
जम्मूत दोन ठिकाणी दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद
![जम्मूत दोन ठिकाणी दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद 2 Soldiers Martyrs In Jammus Nargota Attack जम्मूत दोन ठिकाणी दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/29131015/soldiers.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
श्रीनगर : जम्मूमध्ये नगरोटा आणि सांबा या दोन ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. नगरोटामध्ये सेनेच्या युनिटवर 2-4 दहशतवाद्यांनी सकाळी साडे पाच वाजता हल्ला केला. तर सांबामध्ये बीएसफचे जवान पेट्रोलिंगवर असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला.
नगरोटा हल्ल्यात दोन जवान शहीद
जम्मू काश्मीरमधील नगरोटा तालुक्यात लष्कराच्या तलावर दहशतवाद्यांनी बॉम्बने हल्ला करत युनिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांची संख्या 3-4 असल्याची माहिती आहे. या चकमकीत सेनेचे दोन जवान शहीद झाले, तर एक जवान जखमी आहे.
दरम्यान या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नगरोटा तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सांबा हल्ल्यात 2 दहशतवाद्यांना कंठस्नान
नगरोटासोबतच घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांनी बीएसएफच्या तुकडीवरही हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला तर दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)