धक्कादायक! SBI च्या तिरोजीतून तब्बल 11 कोटींची नाणी गहाळ, सीबीआयकडून चौकशी सुरू
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) तिजोरीमधून तब्बल 11 कोटी रूपयांची नाणी म्हणजे चिल्लर गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) तिजोरीमधून तब्बल 11 कोटी रूपयांची नाणी म्हणजे चिल्लर गहाळ झाल्याची धक्कायक बाब समोर आली आहे. राजस्थानमधील मेहंदीपूर बालाजी येथील एसबीआय शाखेच्या तिरोजीतून ही नाणी गहाळ झाली आहेत. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने एफआयआर दाखल केला असून राजस्थान उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
राजस्थानमधील मेंदीपूर बालाजी येथील एसबीआय शाखेच्या तिजोरीत तब्बल 13 कोटी किमतींची एक, दोन आणि पाच रूपयांची नाणी होती. परंतु, त्यातील काही नाणी गहाळ झाल्याचा संशय आल्यानंतर बँकेकडून जयपूरमधील एका खासगी कंत्राटदाराला ही 13 कोटी नाणी मोजण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या कंत्राटदाराने 22 जुलै 2021 रोजी पैसे मोजण्यास सुरुवात केली. या नाण्यांची मोजणी केल्यानंतर तिरोरीतून 11 कोटी किमतीची नाणी गहाळ झाल्याचे समोर आहे. त्यानंतर बँकेने याबाबत 16 ऑगस्ट 2021 रोजी राजस्थानमधील करौली येथील तोडाभीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तिजोरीतून नाणी गहाळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर बँकेने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राजस्थानच्या कोर्टात धाव घेतली. त्यामुळे कोर्टाने 4 मार्च 2020 रोजी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयला निर्देश दिले. त्यानुसार या चोरी प्रकरणी सध्या सीबीआय तपास करत आहे. 13 एप्रिल 2022 रोजी सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.
दरम्यान, मोजणीनंतर बँकेच्या तिजोरीत शिल्लक राहिलेली दोन कोटी रूपयांची नाणी आरबीआयच्या कॉईन होल्डिंग शाखेत जमा करण्यात आली आहेत.
महत्वाच्या बातम्या