Fake WhatsApp Calls : तुम्हालाही व्हॉट्सअॅपवर बनावट व्हिडीओ काॅल येत आहेत का? असे ओळखा बनावटी कॉल्स
फसवणूक करणाऱ्या लोकांची फसवणूक करण्यासाठी अनेक पद्धती वापरतात. आता AI च्या माध्यामातून स्कॅमर फसवणुकीचे जाळे तयार करत आहे.
Cyber Crime : सायबर फसवणुकीच्या बातम्या आपल्याला रोज पाहायला आणि ऐकायला मिळत असतात. अशातच केरळमधील एक प्रकरण समोर आले आहे. आजपर्यंत आपण अनेकदा Cyber Crime बद्दल ऐकले आहे. मात्र आता याच Cyber Crime साठी AI चा वापर केला जात आहे. फसवणूक करणारे आता AI चा उपयोग करून सामान्य लोकांना फसवतात. संबंधित प्रकरणामध्ये एका व्यक्तीला त्याच्याच ओळखीच्या व्यक्तीकडून एक व्हिडीओ काॅल करण्यात आला. काॅलमध्ये दिसणारी व्यक्ती ही त्याच्या ओळखीची होती. समोरची व्यक्ती त्याला अडचणीचे कारण देत पैसे मागत होती ही बाब उघडकीस आल्यानंतर हा फोन फसवणुकीचा आहे असे लक्षात आले. अशा कॉलसाठी फसवणूक करणारे आता एआय वापरत असल्याचे देखील लक्षात आले.
AI चा वापर करून काॅल कसा केला जातो
अशा परिस्थितीत तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील. शेवटी, एआयच्या मदतीने बनावट व्हिडीओ कॉल कसा होतो? ते लोकांना आपले शिकार कसे बनवतात? याबाबत स्पष्टीकरण देताना सायबर तज्ज्ञ डॉ. पवन दुग्गल म्हणाले की, AI चा उपयोग सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे केला जातो. सायबर फसवणूक करणार्यांसाठी AI देखील खूप उपयुक्त ठरत आहे. AI च्या माध्यामातून लोकांचा विश्वास जिंकला जात आहे. या प्रकारच्या बनावट व्हिडीओ कॉलमध्ये तुम्हाला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीकडून व्हिडीओ कॉल येतो. तुम्ही नीट पाहिल्यास, हा व्हिडीओ काॅल खोटा किंवा मॉर्फ केलेला असल्याचे तुमच्या लक्षात येईल. एकदा का तुमचा विश्वास बसला की कॉल करून पैसे पाठवले की तुम्ही सायबर फसवणुकीला बळी पडाल.
बनावट कॉल कसे ओळखायचे?
- याला उत्तर देताना पवन दुग्गल सांगतात की, जर तुम्हाला कोणाचाही कॉल आला तर सर्वप्रथम तुम्ही हा विचार केला पाहिजे की ज्याने व्हिडीओ कॉल केला आहे ती व्यक्ती तुम्हाला अनेकदा कॉल करते का? जी व्यक्ती तुम्हाला दररोज व्हिडीओ कॉल करत नाही, तर तुम्ही त्या व्हिडीओ कॉलकडे दुर्लक्ष करावे.
- जर व्हिडीओ कॉल तुमच्या जवळच्या व्यक्तीचा असेल, तर तो कॉल डिस्कनेक्ट केल्यानंतर, तुम्ही त्यांना एकदा कॉल करून त्याची चौकशी केली पाहिजे.
- कारण सायबर घोटाळेबाज एका अॅपच्या माध्यमातून चित्रांवर ऑडिओ बसवतात. त्यामुळे तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा आवाज येतो पण ओठांची हालचाल अगदी खोटी आहे. ते सहज ओळखता येते.
व्हॉट्सअॅप फिचर
सायबर तज्ञ सांगतात की व्हॉट्सअॅपवर एक नवीन फीचर आले आहे. त्याच्या मदतीने तुम्ही अनोळखी कॉल सायलेंट करू शकता. फसवणूक टाळण्यासाठी हे फिचर वापरले जाऊ शकते. व्हॉट्सअॅपच्या सर्व फीचर्सबद्दल बहुतांश लोकांना अजूनही माहिती नाही. व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही हे फीचर सेट करू शकता.
इतर महत्वाच्या बातम्या