Truecaller : आता स्पॅम कॉल्सपासून होणार सुटका; Truecaller चं AI Assitance फीचर लाँच
Truecaller AI Assistance Feature : Truecaller ने एक नवीन फीचर आणले आहे जे लोकांना स्पॅम कॉलपासून मुक्त होण्यास मदत करेल.
Truecaller AI Assistance Feature : सध्या स्पॅम कॉल्सचं (Spam Calls) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. साधारणपणे, प्रत्येक व्यक्तीला दिवसा एक तरी स्पॅम कॉल येतो. Truecaller ने स्पॅम कॉल्सपासून मुक्त होण्यासाठी एक नवीन AI पॉवर्ड फीचर आणले आहे. कंपनीने AI असिस्टंट फीचर (Assistant Feature) जारी केले आहे. या फीचरच्या माध्यमातून लोकांना कॉल उचलायचा की नाही हे सांगण्यासाठी मशीन लर्निंग आणि क्लाउड टेलिफोनीचा वापर करते. सध्या AI असिस्टंट Android यूजर्ससाठी उपलब्ध आहे. यूजर्स अॅपची नवीन व्हर्जन डाऊनलोड करून हे फीचर वापरू शकता.
Truecaller चे नवीन फीचर ऑटोमॅटिक (Automatic) कॉल रिसीव्ह करते आणि यूजर्सना कॉल रिसीव्ह करायचा की नाही हे सांगण्यासाठी कॉलरच्या आवाजाचे ट्रान्सक्राईब करते. जर तुम्ही हे फीचर चालू केले असेल आणि तुम्ही फोनपासून दूर असाल, तर एखादा कॉल आल्यास, Truecaller स्वतः कॉल रिसीव्ह करतो आणि तो स्पॅम असल्यास तुम्हाला कळवतो. Truecaller MD India ऋषित झुनझुनवाला म्हणाले की, आतापर्यंत Truecaller तुम्हाला कोण कॉल करतंय हे कळायचं पण आता तुम्ही Truecaller असिस्टंटला तुमच्या वतीने कॉलरशी संवाद साधू देऊ शकता जेणेकरून तुम्हाला अनावश्यक स्पॅम कॉल्स उचलावे लागणार नाहीत.
नवीन फीचर कसे कार्य करते?
नव्याने सुरु करण्यात आलेलं हे AI Assistance फीचर चालू ठेवून, जेव्हाही तुम्हाला कॉल येईल, तेव्हा तुम्ही ते डिजिटल असिस्टन्समध्ये ट्रान्सफर करू शकता. म्हणजे AI तुमच्याऐवजी तुमचा कॉल रिसीव्ह करणार आहे. कॉल रिसीव्ह केल्यानंतर AI कॉलरचा आवाज टेक्स्टमध्ये ट्रान्सफर करेल आणि तुम्हाला कॉल करायचा की नाही हे सांगण्यास मदत होईल.
Assistant Feature तीन भाषांमध्ये उपलब्ध
सध्या, हे फीचर Android यूजर्ससाठी 14-दिवसांच्या विनामूल्य चाचणीवर उपलब्ध आहे. टेस्टिंग संपल्यानंतर, तुम्ही Truecaller प्रीमियम असिस्टंट प्लॅनचा भाग म्हणून 149 रुपये प्रति महिना पासून असिस्टंट फीचर जोडू शकता. हा प्लॅन सध्या प्रमोशनल डील अंतर्गत 99 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Truecaller AI Assistance Feature सुरुवातीला भारतात इंग्रजी, हिंदी आणि 'हिंग्लिश' भाषांमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही AI संदेश सानुकूलित (कस्टमाईज्ड) करू शकता आणि आवाज बदलू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :